सिम्बॉलिक फोटो
सिम्बॉलिक फोटो

झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्याच्या बोरियो पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील दुर्गा टोला पंचायतीच्या तेतरिया पहाड येथील निवासी गुली पहाडिया यांचा मृत्यू डुक्कर मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दारूगोळ्यामुळे झाला. हा दारूगोळा त्याने लाडू समजून खाल्ला. दाताखाली हा गोळा चावला असता स्फोट झाला व त्यात त्याचा जबडा फाटला. जागेवरच त्याचा मृत्यू झाला. या घटनेत एका श्वानाचाही मृत्यू झाला. गुलीने बारूदचा एक गोळा श्वानालाही खाऊ घातला होता.

बोरियो (Boriyo).  झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्याच्या बोरियो पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील दुर्गा टोला पंचायतीच्या तेतरिया पहाड येथील निवासी गुली पहाडिया यांचा मृत्यू डुक्कर मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दारूगोळ्यामुळे झाला. हा दारूगोळा त्याने लाडू समजून खाल्ला. दाताखाली हा गोळा चावला असता स्फोट झाला व त्यात त्याचा जबडा फाटला. जागेवरच त्याचा मृत्यू झाला. या घटनेत एका श्वानाचाही मृत्यू झाला. गुलीने बारूदचा एक गोळा श्वानालाही खाऊ घातला होता.

बोरिया ठाण्याचे प्रभारी लवकुमार सिंह यांनी सांगितले की, गुलीने शनिवारी बोरियो येथील बाजारातून बारूदी गोळा खरेदी केला होता. यामुळे पिकांचे डुक्करांपासून संरक्षण होते. बोरियो येथील बाजारातून 20 किमी प्रवास करून तो तेतरिया पहाड येथे पोहोचला. त्यावेळी तो नशेत होता. एक गोळा त्याने कुत्र्याला देखील खाऊ घातला. दोघांचाही मृत्यू झाला. गुलीच्या झोळीत बारूदचे आणखी काही गोळेदेखील मिळाले.

गोळ्यात मिसळला जातो मांसाचा तुकडा
दारूगोळा बनविण्यासाठी बारूदबरोबरच शिसे व मांसाचे तुकडे मिसळण्यात येतात. हे गोळे शेताच्या मधोमध ठेवले जातात. जेव्हा जंगली डुक्कर शेतात येतात, तेव्हा मांसाच्या वासाने ते या गोळ्याजवळ येतात व तो गोळा खातात. यामुळे त्यांचा मृत्यू होतो. याप्रकारे पिकांचे संरक्षण करण्यात येते. तसेच जंगली डुक्कराचे मांस खाण्यासाठी मिसळण्यात येते.