garland of slippers in temple

कर्नाटकच्या(Karnatak) गुलबर्ग जिल्ह्यात गोला गाव स्थित लकम्मा देवी (lakamma Devi Temple) मंदिरात लोकं चप्पल चढवतात. मंदिरासमोर एक कडुनिंबाचे झाड आहे जिथे लोकं चपलेचा(Garland Of slippers) हार घालून देवीला साकडं घालतात.

    आपण अशी खूप मंदिरं(Temple) बघितलं असतील जिथे देवाला सोनं, चांदी, रुपये, फळं, धान्य व इतर वस्तू अर्पण केल्या जातात. मात्र भारतात एक असे देऊळ आहे जिथे देवीला प्रसन्न करण्यासाठी चपलांचा हार अर्पण(Temple With Tradition Of Garland Of Slippers) करण्याची प्रथा आहे.

    कर्नाटकच्या(Karnatak) गुलबर्ग जिल्ह्यात गोला गाव स्थित लकम्मा देवी (lakamma Devi Temple) मंदिरात लोकं चप्पल चढवतात. मंदिरासमोर एक कडुनिंबाचे झाड आहे जिथे लोकं चपलेचा(Garland Of slippers) हार घालून देवीला साकडं घालतात.

    इथे आणखी एक विशेष बाब म्हणजे मंदिरात पूजा करणारा पुजारी हिंदू नसून मुसलमान आहे.

    दरवर्षी दिवाळीमध्ये इथे सहा दिवस फूटवेअर फेस्टीवलचं आयोजन केलं जातं. लोक या जत्रेची खूप वाट बघत असतात.तेव्हा प्रसादाच्या दुकानांसह चपलांच्या दुकानेही दिसतात.  हजारो लोकं यात सामील होतात. लोक या फेस्टिवलच्या काळात चपलांची माळ अर्पण करतात. तसेच देवीकडे आपली ईच्छा व्यक्त करतात. नवस बोलतात आणि चपला झाडाला टांगून भाविक निघून जातात.

    लकम्मा देवीच्या भक्तांच्या मते, चपलांची माळ अर्पण केल्याने देवी मनोकामना पूर्ण करते. भक्तांनी अर्पण केलेल्या चपला घालून रात्री देवी फिरते आणि वाईट शक्तींपासून भाविकांच रक्षण करते अशी आख्यायिका आहे. असेही म्हटले जाते की या मंदिरात चपला अर्पण केल्याने लोकांचा पाय आणि गुडघ्यांचं दूखणं कायमचं दूर होतं.या मंदिरात बैलांचा बळी दिला जायचा पण आता ती प्रथा बंद झाली आहे.