जन्मत:च 24 बोटे; बाळाला बघण्यासाठी रुग्णालयात मोठी गर्दी

ही सर्व बोटे सुटीसुटी असून नेहमीच्या बोटांसारखीच दिसत आहेत. ती एकमेकांना चिकटलेली नाहीत. मात्र, या अर्भकाला मोठेपणी या 24 बोटांचा त्रास होऊ शकतो. या अर्भकाचा जन्म अगदी सुखरूप झालेला आहे. त्याची इतर प्रकृती सुदृढ आहे. केवळ बोटांचा अपवाद वगळता हे अर्भक अगदी सर्वसामान्य अर्भकांप्रमाणेच आहे. त्याच्या प्रत्येक हाताला आणि पायाला सहा-सहा बोटे आहेत, हे त्याचा जन्म झाल्याबरोबर लगेच लक्षात आले.

    चंदीगड : हरयाणाच्या कर्नाळ जिल्ह्यात एका अनोख्या अर्भकाचा जन्म झाला आहे. त्याच्या हातांना आणि पायांना मिळून 24 बोटे आहेत. त्यामुळे या मुलाला बघण्यासाठी रुग्णालयात मोठी गर्दी होत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार असे बालक त्यांनी त्यांच्या आयुष्यात जन्माला आलेले पाहिलेले नाही. सर्वसाधारणपणे हाताला पाच म्हणजे दोन्ही हातांची मिळून दहा बोटे असतात. क्वचितप्रसंगी एका हाताला सहा बोटेही असू शकतात. पण दोन हात आणि दोन पाय यांना एकूण 24 बोटे असणारे हे कदाचित भारतातले पहिलेच उदाहरण असावे, असे बोलले जात आहे.

    मुख्य म्हणजे ही सर्व बोटे सुटीसुटी असून नेहमीच्या बोटांसारखीच दिसत आहेत. ती एकमेकांना चिकटलेली नाहीत. मात्र, या अर्भकाला मोठेपणी या 24 बोटांचा त्रास होऊ शकतो. या अर्भकाचा जन्म अगदी सुखरूप झालेला आहे. त्याची इतर प्रकृती सुदृढ आहे. केवळ बोटांचा अपवाद वगळता हे अर्भक अगदी सर्वसामान्य अर्भकांप्रमाणेच आहे. त्याच्या प्रत्येक हाताला आणि पायाला सहा-सहा बोटे आहेत, हे त्याचा जन्म झाल्याबरोबर लगेच लक्षात आले.

    तथापि, बोटांची स्थिती चांगली असल्यामुळे या मुलाला पुढे त्याचा फारसा त्रास होण्याची शक्मयता नाही, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. ही घटना दुर्मीळातील दुर्मीळ म्हणून ओळखली जात आहे.