हरयाणात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी केलं आंदोलन, पोलिसांकडून लाठीचार्ज

आज करनालच्या(Karnal) घरौंडा येथील टोलनाक्यावर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर(Manoharlal Khattar) यांच्या कार्यक्रमाचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज(Lathicharge On Farmers By Police) करण्यात आला.

    हरयाणात शेतकरी आंदोलनाला(Farmers Protest In Haryana) पुन्हा धार चढली आहे. आज करनालच्या(Karnal) घरौंडा येथील टोलनाक्यावर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर(Manoharlal Khattar) यांच्या कार्यक्रमाचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज(Lathicharge On Farmers By Police) करण्यात आला. शेतकरी संघटनांनी संताप व्यक्त केला.

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी करनालमध्ये भाजपाच्या राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासह भाजपाचे ६ खासदार, ६ राज्यसभा खासदार, १२ आमदार, माजी आमदार आणि लोकसभा, विधानसभा लढलेले उमेदवारांसह संघटनेचे पदाधिकारी या बैठकीला आले होते. यावेळी विरोध दर्शवण्यासाठी शेतकरी बसताडा टोल नाक्यावर ठिय्या मांडून बसले होते. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला.

    शुक्रवारी शेतकरी नेत्यांनी एक व्हिडिओच्या माध्यमातून भाजपा नेते आणि बैठकीचा विरोध करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर करनालमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली होती. रस्ते सील करण्यात आले होते. यासाठी शेतकऱ्यांनी नॅशनल महामार्ग ४४ वरील बसताडा टोल नाक्यावर ठिय्या मांडला. त्यानंतर पोलिसांनी दुपारी सव्वा बारा वाजता लाठीचार्ज केला. शेतकरी जखमी झाल्याचीही माहिती मिळाली आहे.