rjp protest at bihar assembly

बिहारमधील(bihar) अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव(tejaswi yadav) यांच्या नेतृत्वात बिहार विधानसभेला घेराव(bihar legislative assembly) घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने त्यांना परवानगी दिली नव्हती. दरम्यान, डाकबंगला चौकात मोर्चा आल्यावर पोलिसांनी त्यांना अडविले.

    दिल्ली: बिहारमधील वाढती गुन्हेगारी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय जनता दलाचे नेते (राजद) तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात बिहार विधानसभेला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी बळाचा वापर करत राजद कार्यकर्त्यांवर पाण्याचा मारा आणि लाठीचार्ज केला. यावेळी राजद कार्यकर्त्यांकडून जोरदार दगडफेकही करण्यात आली. यात अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांनी तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांना ताब्यात घेतले.

    पोलिसांवर दगडफेक
    बिहारमधील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात बिहार विधानसभेला घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने त्यांना परवानगी दिली नव्हती. दरम्यान, डाकबंगला चौकात मोर्चा आल्यावर पोलिसांनी त्यांना अडविले. यावेळी राजद कार्यकर्त्यांनी दगडफेक सुरू केली. धक्कादायक म्हणजे या मोर्चामध्ये तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांनी हेल्मेट घातले होते.

    पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलकांवर पाण्याचा मारा केला. आंदोलक ऐकायला तयार नाहीत हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आले होते. राजधानीमध्ये या आंदोलनादरम्यान वातावरण तणावपूर्ण झाले होते.

    वाढती बेरोजगारी आणि सरकारच्या क्रूर वृत्तीविरुद्ध आम्ही शांततेत निदर्शने करीत होतो. पण आमच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला, पोलिसांनी दगड फेकले. समस्यांची सोडवणूक करण्याऐवजी बिहारवासियांवरच अन्याय सुरू झाला आहे, असे तेजप्रताप यादव यांनी म्हटले आहे.