आज लठमार होली, मथुरेत असा साजरा होतो सण, अगोदर लाडू, मग काठ्या !

त्यापूर्वी नंदगावातील तरूण राधाराणीच्या गावात जाऊन होळीचं आमंत्रण देतात. या तरुणांच्या आगमनानंतर मोठ्या प्रमाणावर लाडू वाटले जातात. याला लड्डूमार होली असं म्हणतात. अगोदर लड्डूमार होली खेळली जाते आणि त्यानंतर लठमार होली खेळण्यात येेते. बरसानातील तरुणी नंदगावातील तरुणांना काठीने मारतात आणि या काठ्यांचे वार तरुण आपल्या हातातील ढालीवर झेलतात. या पारंपरिक उत्सवाला लठमार होली असं म्हटलं जातं.

    उत्तर भारतात अनेक ठिकाणी लठमार होली हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या उत्सवाची मूळ परंपरा श्रीकृष्ण आणि राधा यांच्यापासून सुरू होत असल्याचं सांगितलं जातं. मथुरेत बरसाना आणि नंदगाव या दोन गावांत लठमार होळी उत्साहात साजरी करण्यात येते.

    बरसाना हे राधेचं गाव, तर नंदगाव हे कृष्णाचं गाव. बरसानातील राधाराणीच्या महालातून गावातल्या तरुणी गुलाल घेऊन होळी खेळण्याचं आमंत्रण देण्यासाठी नंदगाव या कृष्णाच्या गावी जातात. तिथे होळी खेळण्याचं निमंत्रण देतात. नंदगावातील गोस्वामी समजात या गुलालाचं वाटप करण्यात येतं. तर नंदगावमध्ये राधाराणीच्या या सखींसोबत जोरदार उत्सव साजरा करण्यात येतो.