Law against Love Jihad in Karnataka too; The fourth BJP-ruled state to bring this law

बंगळुरू : भाजपशासित आणखी एका राज्याने लव्ह जिहाद विरोधात पाऊल उचलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सीएन अश्वथ यांनी राज्यात लव्ह जिहादच्या संबंधातील घटना रोखण्यासाठी कायदा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. लव्ह जिहाद सोबत कर्नाटकात गोहत्या बंदी कायदाही केला जाणार असल्याचे, त्यांनी सांगितले.

कर्नाटकमध्ये लग्नासाठी होणाऱ्या धर्म परिवर्तनाच्या घटना रोखण्यासाठी कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सप्ष्ट केले. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरयाणा पाठोपाठ लव्ह जिहाद विरोधात कायदा करणारे कर्नाटक चौथे भाजपाशासित राज्य ठरणार आहे.

बऱ्याच राज्यांनी लव्ह जिहादशी संबंधित बिले आधीच सादर केली आहेत, तर काही राज्यात आणण्याची तयारी आहे. आम्ही ‘लव्ह जिहाद’विरूद्ध विधेयक आणि गोहत्येवर पूर्णपणे बंदी आणण्याची तयारी करीत आहोत. कर्नाटकात लव्ह जिहादविरूद्ध कायदा होईल, असे राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनीही गुरुवारी सांगितले होते.

बसवराज बोम्मई म्हणाले होते की, कर्नाटकात लव्ह जिहाद विरोधात कायदा होईल. या कायद्यासाठी उत्तरप्रदेशात आणलेल्या अध्यादेशाची माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उत्तरप्रदेश हे देशातील पहिले राज्य आहे, जेथे लव्ह जिहादविरोधात अध्यादेशास मंजूरी दिली आहे. त्याशिवाय मध्यप्रदेश, बिहार, कर्नाटक, हरयाणा आणि हिमाचल प्रदेशात या विषयावर कायदा करण्याची तयारी सुरू आहे.