नेत्यांना दारू न पिता झोप येत नाही; बिहारमधील राजद आमदाराचा दावा

सभागृहात बसलेले काही नेते व पदाधिकारी असे आहे ज्यांना रात्री दारू प्यायली नाही, तर झोप येत नाही. दारू त्यांच्यासाठी आवश्यक आहे. अशातच हा कायदा फक्त गरिबांना त्रास देण्यासाठी बनविण्यात श्आला आहे. गरिबांना अटक होते व पांढरपेशी मजेता दारूचे सेवन करतात असा दावा  राजदचे भाई वीरेंद्रने केला आहे.

    पाटणा : बिहार विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशानदरम्यान बुधवारी विरोधी पक्षाने खूप गोंधळ केला. राज्यातील दारूबंदीचा कायदा अयशस्वी झाल्याचा मुद्दा उचलत राजद आमदार भाई वीरेंद्र, ललित यादव, काँग्रेस आमदार अजीत शर्मासहित विरोधी पक्षाच्या अन्य नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला व दारूबंदीच्या कायद्याची समीक्षा करण्याची मागणी केली.

    सभागृहात बसलेले काही नेते व पदाधिकारी असे आहे ज्यांना रात्री दारू प्यायली नाही, तर झोप येत नाही. दारू त्यांच्यासाठी आवश्यक आहे. अशातच हा कायदा फक्त गरिबांना त्रास देण्यासाठी बनविण्यात श्आला आहे. गरिबांना अटक होते व पांढरपेशी मजेता दारूचे सेवन करतात असा दावा  राजदचे भाई वीरेंद्रने केला आहे.

    दुसरीकडे, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजीत शर्मा यांनी सांगितले की, बिहारमध्ये प्रत्येक ठिकाणी दारू मिळते, हे कोणीही नाकारणार नाही. मी दारूबंदी कायद्याच्या पुनरावलोकनाचा मुद्दा उचलतो, तर नितीश चिडतात. परंतु सत्यता ही आहे की, यामुळे महसूलाची हानीशिवाय कोणताही फायदा होताना दिसत नाही.

    राज्यात दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात यावी, यामुळे दोन फायदे होतील. पहिला- गरीब दारू खरेदी करणार नाही व दुसरा असा की, दारूविक्रीमुळे येणाऱ्या पैशातून उद्योग लागतील व युवकांना रोजगार मिळेल, असेही त्यांनी सांगितले.