now leopard infected with corona, Quarantine done to museum animals

जम्मू काश्मीरमधील(Jammu Kashmir) बुडगाव जिल्ह्यात एका बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय मुलीचा मृत्यू(4 year girl Death) झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    जम्मू काश्मीरमधील(Jammu Kashmir) बुडगाव जिल्ह्यात एका बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय मुलीचा मृत्यू(4 year girl Death) झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अदा शकील असं ४ वर्षीय मुलीचं नाव आहे. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शकील अहमद यांची ४ वर्षांची मुलगी अदा ही प्रागंणात खेळत होती. त्यावेळेस बिबट्याने तिच्यावर हल्ला (Leopard Attack on Girl) केला आणि तिला फरफटत घेऊन गेला.

    या घटनेची माहिती पोलिसांना तात्काळ देण्यात आली. पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. या भागात बिबट्याचं दर्शन होत असल्याने डरकाळीची दहशत कायम आहे.

    अदाला शोधण्यासाठी पोलिसांनी ग्रामस्थ, वनविभाग आणि लष्कराची मदत घेतली गेली. टीम तयार करून वेगवेगळ्या भागात शोध सुरु करण्यात आला. तासाभराच्या शोधमोहिमेनंतर एका टीमला नर्सरीजवळ रक्ताच्या खुणा आढळून आल्या. त्यानंतर त्या टीमने इतर लोकांच्या मदतीने त्याचा मागोवा काढला. त्या दिशेने पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली. त्यानंतर जी भीती वाटत होती ती खरी ठरली. एका नर्सरीजवळ तिच्या शरीराचे अवयव सापडले आणि तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.

    या भागात यापूर्वीही बिबट्या दिसून आल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतरही कारवाई केली नाही असा ग्रामस्थांचा आरोप आहे.

    “आम्ही वनविभागाला नर्सरीबाबत वारंवार तक्रारी केल्या. नर्सरी घनदाट असल्याने इथे बिबट्यांचा वावर आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे.”, असं ग्रामस्थांनी वनविभागाला सांगितलं होतं. मात्र वन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.