शिर्डीत साई दर्शनासाठी भक्तांच्या संख्येला मर्यादा

वाढत्या कोरोनाच्या रूग्णांमुळे शिर्डीत साईदर्शनाला आता मर्यादा घालन्यात आल्या असून आता सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंतच साईदर्शन व्यवस्था सुरू राहणार आहे. पहाटेची काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीला भाविकांना 'नो एंट्री' करण्यात आली आहे.

    शिर्डी (Shirdi). वाढत्या कोरोनाच्या रूग्णांमुळे शिर्डीत साईदर्शनाला आता मर्यादा घालन्यात आल्या असून आता सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंतच साईदर्शन व्यवस्था सुरू राहणार आहे. पहाटेची काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीला भाविकांना ‘नो एंट्री’ करण्यात आली आहे. रविवार, शनिवार , गुरूवार आणि सुट्टयांमध्ये ऑनलाईन पास घेणं बंधनकारक राहील.

    शिर्डीतील ऑफलाईन पास काऊंटर गुरूवार , शनिवार , रविवार आणि सुट्टीच्या दिवशी राहणार बंद राहतील. दिवसभरात केवळ पंधरा हजार भाविकांनाच दर्शन दिल जाईल. दर्शन रांगेतील भक्तांपैकी 150 ते 200 भक्तांची दररोज कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.

    दर गुरूवार काढण्यात येणारी साईपालखी देखील बंद करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे साई संस्थान आणि प्रशासनाला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.