Lightning strikes Dwarkadhish temple, a famous shrine in India, and ... 160 feet flag falls directly on the temple

देशात पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे गोंधळ उडाला आहे. भारतातील प्रसिद्ध धर्मस्थळ असणाऱ्या द्वारकाधीश मंदिरावर (Dwarakadish Temple) वीज (lightning) कोसळल्यामुळे एकच गोंधळ उडाला. अचानक वीज कोसळल्याने मंदिराच्या कळसावर लावलेला 160 फुटी ध्वज मंदिारावर कोसळला. यामुळे ध्वजाचं मोठं नुकसान झाल आहे. मंदिरावर वीज कोसळल्याने कुणालाही दुखापत झालेली नाही. नागरीक सुखरुप आहेत. देवाने हे संकट स्वत:वर ओढून घेतले आहे. यामुळे खरचं देव आहे अशी चर्चा नागरीकांमध्ये रंगली.

    द्वारका : देशात पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे गोंधळ उडाला आहे. भारतातील प्रसिद्ध धर्मस्थळ असणाऱ्या द्वारकाधीश मंदिरावर (Dwarakadish Temple) वीज (lightning) कोसळल्यामुळे एकच गोंधळ उडाला. अचानक वीज कोसळल्याने मंदिराच्या कळसावर लावलेला 160 फुटी ध्वज मंदिारावर कोसळला. यामुळे ध्वजाचं मोठं नुकसान झाल आहे. मंदिरावर वीज कोसळल्याने कुणालाही दुखापत झालेली नाही. नागरीक सुखरुप आहेत. देवाने हे संकट स्वत:वर ओढून घेतले आहे. यामुळे खरचं देव आहे अशी चर्चा नागरीकांमध्ये रंगली.

    रविवारपासून देशभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. हिमाचलमध्ये ढगफुटी झाली आहे. जोरदार पर्जन्यवृष्टीसह बहुतांश राज्यांमध्ये वीज कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. देशभरात 50 हून अधिक लोकांचा वीज कोसळल्याने जीव गेला आहे.

    द्वारकेमध्ये मंगळवारी दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली. विजांचे कानठळ्या बसवणारे आवाज ऐकून नागरीक भयभीत झाले. द्वारकाधीश मंदिरवर वीज कोसळली. परमेश्वरानं नागरिकांवर आलेलं संकट स्वतः झेलल्याची चर्चा द्वारकेत रंगली.