Lightning strikes Dwarkadhish temple, a famous shrine in India, and ... 160 feet flag falls directly on the temple

देशभरात मान्सून सक्रिय झाला असून, अनेक भागांत मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस कोसळत आहे. तर दुसरीकडे विजा कोसळून अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही गेल्या दोन तीन दिवसांत घडल्या आहेत. वीज पडतानाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुजरातमधील द्वारकेत असलेल्या प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिराच्या ध्वजस्तंभावर वीज पडली. वीज पडल्याने मंदिराच्या ध्वजस्तंभाचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना मंगळवारी घडली. वीज पडल्याने मंदिराच्या 52 फूट उंच ध्वजस्तंभाचे नुकसान झाले. मात्र, मंदिराचं कोणतंही नुकसान झालेले नाही.

    द्वारका : देशभरात मान्सून सक्रिय झाला असून, अनेक भागांत मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस कोसळत आहे. तर दुसरीकडे विजा कोसळून अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही गेल्या दोन तीन दिवसांत घडल्या आहेत. वीज पडतानाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुजरातमधील द्वारकेत असलेल्या प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिराच्या ध्वजस्तंभावर वीज पडली. वीज पडल्याने मंदिराच्या ध्वजस्तंभाचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना मंगळवारी घडली. वीज पडल्याने मंदिराच्या 52 फूट उंच ध्वजस्तंभाचे नुकसान झाले. मात्र, मंदिराचं कोणतंही नुकसान झालेले नाही.

    वीज पडल्याच्या घटनेनंतर द्वारकेचे उपजिल्हाधिकारी निहार भेटारिया यांनी घटनेनंतर लगेच मंदिराला भेट दिली आणि परिसराची पाहणी केली. पाहणी करण्यात आल्यानंतर मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम संथगतीने सुरू करण्यात आले.

    द्वारकेत गोमती नदीच्या तिरावर द्वारकाधीश मंदिर उभारण्यात आलेलं असून, हे मंदिर तब्बल 2200 वर्ष जुने आहे. या मंदिर परिसरात भगवान श्रीकृष्ण यांच्याबरोबरच सौभद्रा, बलराम, रेवती, वासुदेव, रुख्मिणी अनेक देवी देवतांचीही स्थापना करण्यात आलेली आहे.