इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करण्यावरुन झाला वाद, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडला जिवंत जाळलं

एका तरुणाने आपल्या प्रेयसीला जिवंत जाळल्याची(Live in Partner Burnt His Girl Friend) घटना समोर आली आहे. ही घटना केरळमधली आहे. या घटनेत २८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे.

    लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाणाऱ्या एका तरुणाने आपल्या प्रेयसीला जिवंत जाळल्याची(Live in Partner Burnt His Girl Friend) घटना समोर आली आहे. ही घटना केरळमधली आहे. या घटनेत २८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. प्रियकराने प्रेयसीला जाळण्यामागचे कारण तुम्ही ऐकाल तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल.

    इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करण्यावरुन दोघांमध्ये मंगळवारी वाद झाला. हा व्हिडिओ तरुणीनं शूट केला होता. वाद झाल्यानंतर तरुणानं प्रेयसीला पेटवून दिलं. गुरुवारी तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला.

    कोल्लम जिल्ह्यातील अंचलमध्ये अथिराला तिच्या लिव्ह इन पार्टनरनं (Live-in partner) पेटवून दिलं. हे दोघं बऱ्याच काळापासून एकत्र राहात होते. त्यांना तीन महिन्यांचं एक बाळही आहे. दोघांमध्ये इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करण्यावरुन वाद झाला. यात शानवासनं आथिरावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिलं.

    आथिराचा आवाज शेजारच्या लोकांना आला. ती बाहेर पळण्याचा प्रयत्न करत होती. सर्वांनी मिळून तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी तिचा मृत्यू झाला. यादरम्यान आरोपीही जखमी झाला होता, त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केलं. आथिराच्या आईच्या तक्रारीनंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तरुणीनं प्रियकराविरोधात शारिरीक आणि लैंगिक शोषणाचा आरोप करत आपल्याला एक महिना फ्लॅटमध्ये बंद करुन ठेवल्याचं म्हटलं होतं. या तक्रारीनुसार, पोलिसांनी ८ एप्रिलला गुन्हा दाखल केला होता. यानंतर आरोपी मार्टिन जोसेफ फरार झाला होता. पोलिसांनी सांगितलं, की या आरोपीनं महिलेकडून पाच लाख रुपयेही बळकवले होते.