Live in Relationship Now what is the court order; Then, even parents cannot prevent 'them' from living together

प्रयागराज : लिव्ह इन रिलेशनशीप(Live in Relationship) बाबत  अलाहाबाद हायकोर्टाने (allhabad high court) एक महत्वाचा निर्णय दिला आहे. दोन प्रौढ व्यक्ती लिव्ह-इन (live-in) रिलेशनशिपमध्ये एकत्र राहू शकतात असे म्हणत अलाहाबाद उच्च न्यायालयाने फर्रुखाबादच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहणाऱ्या एका जोडप्यास सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत

फर्रुखाबादच्या कामिनी देवी आणि अजय कुमार या जोडप्याने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती अंजनी कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती प्रकाश पडिया यांच्या पीठाने हा निर्णय दिला.

आम्ही दोघेही प्रौढ असून एकमेकांवर प्रेम करतो, असा युक्तिवाद  याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर केला. कामिनीच्या आई-वडिलांचा आमच्या नात्याला विरोध आहे. तिने एका वयोवृद्ध व्यक्तीशी लग्न करावे अशी त्यांची इच्छा असून ते तिला यासाठी त्रास देत असल्याचे याचिकाकर्त्यांनी कोर्टाला सांगितलं.

दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर एका महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये असे सांगितले आहे  की जेव्हा मुलगा आणि मुलगी प्रौढ असतील आणि त्यांच्या इच्छेनुसार एकत्र राहत असतील तेव्हा त्यांच्या पालकांसह इतर कुणालाही त्यांच्या एकत्र राहण्यात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही.” ही याचिका स्वीकारताना खंडपीठाने म्हटले आहे की, “आमचं मत आहे की या याचिकाकर्त्यांना एकत्र राहण्याचं स्वातंत्र्य आहे आणि कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या शांततापूर्ण जीवनात हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली जाणार नाही. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ अंतर्गत जीवन जगण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार आहे ज्यामध्ये कोणतीही व्यक्ती जीवन जगण्याच्या आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकारापासून वंचित राहू नये याची तरतूद असल्याचेही न्यायालयाने यावेळी सूचीत केले.