There will be no more autopsy; Home Department Order

मुलगा अल्पवयीनं असल्यानं मुलीची आई या लग्नासाठी तयार नव्हती. याच कारणावरुन मुलगा आणि मुलीमध्ये वाद झाला.त्यानंतर मुलाने आत्महत्या(Suicide) केली.

    पश्चिम बंगालमध्ये(West Bengal) एक विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेत प्रियकरानं गळफास घेत आत्महत्या(Lover`s Suicide) केली. त्यानंतर प्रियकराच्या मृतदेहासोबतच प्रेयसीचं लग्न(Marriage with a Dead Body) लावून देण्यात आलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही घटना पश्चिम बंगालच्या बर्दवान भागात घडली आहे.

    अल्पवयीन मुलगा आणि त्याची प्रेयसी यांचे धर्म वेगवेगळे होते. दोघांचेही नातेवाईक त्यांच्या लग्नासाठी तयार होते. मुलगा अल्पवयीनं असल्यानं मुलीची आई या लग्नासाठी तयार नव्हती. याच कारणावरुन मुलगा आणि मुलीमध्ये वाद झाला.त्यानंतर मुलाने आत्महत्या केली.

    आत्महत्या करण्याआधी या मुलानं आपल्या प्रेयसीला सांगितलं, की तो आत्महत्या करत आहे. यानंतर त्यानं प्रेयसीला आपला फोटो पाठवला आणि आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनानंतर या मुलाचा मृतदेह गावात आणण्यात आला.

    स्थानिकांनी या प्रकरणी मुलगी आणि तिच्या आईला जबाबदार धरत दोघींना मारहाण केली. यानंतर दोघींनाही जबरदस्ती मुलाच्या मृतदेहाजवळ आणण्यात आलं. यानंतर मुलाच्या मृतदेहाकडून मुलीच्या भांगेत कुंकू भरण्यात आलं.

    मृताच्या शेजाऱ्यांचं असं म्हणणं आहे, की या मुलीला याची कल्पना होती, की मुलगा आत्महत्या करत आहे. या मुलीकडे त्याच्या आईचा फोन नंबरही होता. मात्र, तरीही याबाबत मुलाच्या कुटुंबीयांनी तिनं माहिती दिली नाही. वेळेवर मुलाच्या घरच्यांना याबाबत माहिती दिल्यास त्याला वाचवता आलं असतं, असं त्यांनी म्हटलं. दरम्यान मारहाण आणि अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड केल्याची तक्रार मुलीच्या आईनंही पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.