Lucknow Both the candidates got the same number of votes

उत्तर प्रदेशच्या ७५ जिल्ह्यामंध्ये चार टप्प्यांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपा, कॉँग्रेस, समाजवादी पक्ष आणि एमआएमने आपली ताकद पणाला लावली होती. दरम्यान, निकालाच्या दिवशी प्रयागराजमध्ये चक्क टॉसद्वारे एका गावच्या प्रमुखाची निवड करण्यात आली आहे.

    लखनौ : उत्तर प्रदेशच्या ७५ जिल्ह्यामंध्ये चार टप्प्यांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपा, कॉँग्रेस, समाजवादी पक्ष आणि एमआएमने आपली ताकद पणाला लावली होती. दरम्यान, निकालाच्या दिवशी प्रयागराजमध्ये चक्क टॉसद्वारे एका गावच्या प्रमुखाची निवड करण्यात आली आहे.

    उत्तर प्रदेशच्या सोराव येथील करोदी गावात मतमोजणी नंतर समान दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही उमेदवारंना एकसारखीच मते मिळाल्याने गावचा प्रमुख कोण हा प्रश्न उपस्थित झाला होता. बराच वेळ निकाल हाती न आल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या मध्यस्तीने अंतिम विजयी उमेदवार निवडण्यात आला.