marriage

मेडिकल रिपोर्टमध्ये जे समोर आले, त्याने सगळ्यांचेच डोळे विस्फारले. मेडिकल रिपोर्टनुसार वधू ही तृतीयपंथी आहे. आपल्याशी धोका झाला असून, फसवून हे लग्न केल्याचा आरोप, संबंधित कुटुंबाने केला आहे.

    लखनौ : पाच महिने लग्नाला होवूनही पत्नी विविध कारणाणे पतीला जवळ येवू देत नव्हती. पतीला संशय आला आणि त्याने पत्नीची वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पत्नीचे गुपित उघड झाल्यानंतर पतीची झोप उडाली. वैद्यकीय अहवालात पत्नी तृतीयपंथी असल्याचा खुलासा झाल्यानंतर पतीने पत्नीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये ही घटना घडली.

    28 ऑक्टोबर 2020 ला या तरुणाचे लग्न झाले होते. मात्र पती-पत्नीची मधुचंद्राची रात्र त्याच्या नशिबातच नव्हती. नववधू घरी आल्याने कुटुंबात आनंद होता. मात्र लग्नाला जवळपास पाच महिने झाले तरीही वधू आपल्या नवऱ्याला हातही लावू देत नव्हती. दररोज काही ना काही कारण सांगत होती. सतच्या बहान्यांनी वैतागलेल्या पतीला संशय आला. त्याने थेट तिची वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेतला.

    मेडिकल रिपोर्टमध्ये जे समोर आले, त्याने सगळ्यांचेच डोळे विस्फारले. मेडिकल रिपोर्टनुसार वधू ही तृतीयपंथी आहे. आपल्याशी धोका झाला असून, फसवून हे लग्न केल्याचा आरोप, संबंधित कुटुंबाने केला आहे.

    वर आणि वधूच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये जोरदार गोंधळ घातला. मुलाच्या कुटुंबाने वधूला घरात ठेवण्यास नकार दिला. या कुटुंबाने पोलिसांना वधूचा मेडिकल रिपोर्ट दाखवला. जोरदार राडा झाल्यानंतर नववधू आपल्या माहेरच्या माणसांसोबत घरी निघून गेली.