madhyapradesh by election

मध्यप्रदेशातील २२ मतदारसंघातील आलेल्या कलानुसार भाजपाने १३ जागांवर आघाडी घेतली आहे. तसे काँग्रेसने ७ जागांवर आघाडी घेतली आहे. इतर पक्ष दोन आणि १ जागांवर आहे. मध्यप्रदेशमधील सरकार टिकवण्यासाठी भाजपाला किमान ९ ते १० जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. तर काँग्रेसला मात्र २८ पैकी १८ जागा जिंकणे आवश्यक आहे.

मध्यप्रदेश : मध्यप्रदेशमध्ये पोटनिवडणूकीच्या (Madhya Pradesh by-election results) मतमोजणीलाही सुरुवात झाली आहे. याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या मतमोजणीमध्ये भारतीय जनता पक्षाने आघाडी  (BJP leads) मिळवली आहे. तर काँग्रेससह इतर पक्ष पिछाडीवर आहेत. मध्य प्रदेशमध्ये १८ जागांवर पोटनिवडणुक होत आहे. येथील २२ मतदार संघामधील कल समोर आले आहेत.

मध्यप्रदेशातील २२ मतदारसंघातील आलेल्या कलानुसार भाजपाने १३ जागांवर आघाडी घेतली आहे. तसे काँग्रेसने ७ जागांवर आघाडी घेतली आहे. इतर पक्ष दोन आणि १ जागांवर आहे. मध्यप्रदेशमधील सरकार टिकवण्यासाठी भाजपाला किमान ९ ते १० जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. तर काँग्रेसला मात्र २८ पैकी १८ जागा जिंकणे आवश्यक आहे.

मध्य प्रदेश पोटनिवडणुकीचे निकाल विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या प्रभावाचे सूचक असतील. मध्य प्रदेश पोट निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबरला (मंगळवार) जाहीर होईल. २३० सदस्यीय राज्य विधानसभेच्या २८ पैकी २५ जागांवर खासदार पोटनिवडणूक होणे आवश्यक होते. नंतर कॉंग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उर्वरित तीन मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. मध्य प्रदेशातील पोटनिवडणूक ३ नोव्हेंबर, २०२० रोजी घेण्यात आली. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार पोटनिवडणुकीत ७०.२७ टक्के मतदान झाले.