काँग्रेस नेते कमलनाथ यांची तब्येत खालावली, मेदांता रुग्णालयात उपचार सुरु

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ(Kamalnath Admitted To Hospital) यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कमलनाथ यांना ताप आल्यानंतर त्यांना बुधवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    मध्य प्रदेशचे(Madhya Pradesh) माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ(Kamalnath Admitted To Hospital) यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कमलनाथ यांना ताप आल्यानंतर त्यांना बुधवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    फेब्रुवारी महिन्यात माजी मुख्यमंत्री कमलनाथ मध्य प्रदेशातील इंदूर येथील खासगी रुग्णालयात लिफ्ट पडण्याच्या अपघातातून बचावले होते. त्यावेळी अपघाताच्या परिणामामुळे घाबरून गेल्यामुळे त्यांची तब्येत ढासळली होती. त्यानंतर रुग्णालयातच त्यांचा रक्तदाब तपासण्यात आला होता.

    कोरोना काळात कमलनाथ सक्रिय आहेत. या दरम्यान त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. केंद्रात अनेक मंत्रालयाचा पदभार सांभाळलेले कमलनाथ २०१८ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र काँग्रेसमधील बंडखोरीनंतर एका वर्षातच काँग्रेसचे सरकार पडले. त्यानंतर भाजपने सरकार स्थापन केले.