‘दस दिन में कर्ज माफ, पंधरा मिनट में चीन साफ’, भाजपा नेत्याचा राहुल गांधींना टोला

राहुल गांधींनी चीनसंदर्भात एक विधान केलं होतं. त्यावरून भाजपाचे नेते नरोत्तम मिश्रा यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र (criticize ) सोडले आहे. दरम्यान, दस दिन में कर्ज माफ, पंधरा मिनट में चीन साफ’, असा सणसणीत टोला मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लगावला आहे.

चीन (China) आणि कृषी कायद्यांवरून (Agricultural laws) केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांना मध्य प्रदेशचे गृहमंत्री आणि भाजपाचे नेते नरोत्तम मिश्रा (Madhya Pradesh Home Minister Narottam Mishra) यांनी टोला लगावला आहे. राहुल गांधींनी चीनसंदर्भात एक विधान केलं होतं. त्यावरून भाजपाचे नेते नरोत्तम मिश्रा यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र (criticize ) सोडले आहे. दरम्यान, दस दिन में कर्ज माफ, पंधरा मिनट में चीन साफ’, असा सणसणीत टोला मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लगावला आहे.

राहुल गांधींना काय म्हणाले भाजपाचे नेते नरोत्तम मिश्रा

काँग्रेसचं सरकार असतं, तर १५ मिनिटात चीनला हाकललं असतं, असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेती वाचवा रॅलीला केलं होतं. राहुल गांधी यांच्या या विधानावरून “दहा दिवसांत कर्जमाफी, १५ मिनिटांत चीनला साफ करणार. मी त्या गुरूंना नमन करतो ज्यांनी राहुल गांधींना शिकवलं. मला एक समजत नाही की, इतक्या चांगल्या दर्जाची नशा हे कोठून आणतात?,” असं म्हणत मिश्रा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी भित्रे आहेत. त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. काँग्रेसचं सरकार असतं, तर १५ मिनिटात चीनला हाकललं असतं. संपूर्ण जगात एकमेव असा देश आहे की, ज्या देशात चीनचं सैन्य आलं आणि भारताची जमीन हडपली.