‘Mahamahal’ to be the Taj Mahal in the kingdom of Yogis The Taj Mahal was formerly a Shiva temple; Controversial statement of BJP MLA Surendra Singh

मुस्लीम राज्यकर्ते व आक्रमणकर्त्यांनी भारताची संस्कृती नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल. पण आता ती पूर्ववत करण्यासाठी सुवर्णकाळ आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे शिवाजी महाराजांच्या कुळातील आहेत. आणि ते नक्कीच ताजमहालचे नाव बदलतील असे भाजप आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले. ताजमहल हे शिवमंदीर असल्याचा वाद -ताज महाल ही कबर नसून वास्तवात ही वास्तू म्हणजे शिवमंदिर असलेले तेजोमहल असल्याचे काही हिंदूवादी संघटनांनकडून म्हटले जाते, हे येथे उल्लेखनीय.

    लखनौ :  उत्तर प्रदेशचे भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी पुन्हा एकदा बोलताना अकलेचे तारे तोडले आहेत. ताजमहल हे पूर्वी शिवमंदिर होते. त्यामुळे लवकरच ताजमहलाचे नाव बदलून राममहल असे ठेवण्यात येईल, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नाथ यांचा उल्लेख त्यांनी शिवाजी असा केला. उत्तर प्रदेशात शिवाजीचे वंशज म्हणून आदित्यनाथ आले आहेत, असे ते म्हणाले.

    मुस्लीम राज्यकर्ते व आक्रमणकर्त्यांनी भारताची संस्कृती नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल. पण आता ती पूर्ववत करण्यासाठी सुवर्णकाळ आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे शिवाजी महाराजांच्या कुळातील आहेत. आणि ते नक्कीच ताजमहालचे नाव बदलतील असे भाजप आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले. ताजमहल हे शिवमंदीर असल्याचा वाद -ताज महाल ही कबर नसून वास्तवात ही वास्तू म्हणजे शिवमंदिर असलेले तेजोमहल असल्याचे काही हिंदूवादी संघटनांनकडून म्हटले जाते, हे येथे उल्लेखनीय.

    सुरेंद्रसिंह यांनी मोरादाबाद येथे सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासमोर पत्रकारांना मारहाण, त्यांचे कॅमेरे तोडण्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. सपावाल्यांचे खरे चारित्र्यच असे आहे की ते दिसून येते. यात नवे असे काहीच नाही तो त्यांना मिळालेला संस्कारच आहे अशी टीका त्यांनी केली.

    आमदार सुरेंद्रसिंह यांनी बंगाल विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले. बंगाल वाचवायचा असेल तर बंगालच्या लोकांना ममतांचा त्याग करावा लागेल. कारण ममता बॅनर्जी राक्षस आहेत. लोकांच्या सहानुभूतीसाठी त्या जखमी असल्याचे नाटक करत आहेत, असे सिंह म्हणाले.