maharana pratap photo kept near feet

राजस्थानातील(rajasthan) वल्लभनगर विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या युवक संमेलनात प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया(satish puniya) यांच्या हस्ते तरुणांना वीर शिरोमणी महाराणा प्रतापांच्या प्रतिमा(maharana pratap photo kept near feet) देण्यात आल्या. मात्र त्या स्वीकारल्यानंतर मंचावर बसलेल्या पदाधिकारी आणि पाहुण्यांच्या पायांजवळ त्या प्रतिमा ठेवण्यात आल्या. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

    दिल्ली: सोशल मीडियावर उदयपूरमधील(udaypur) एक फोटो जोरदार व्हायरल (viral photo)होत आहे. यामध्ये महाराणा प्रताप यांची प्रतिमा पदाधिकाऱ्यांच्या पायाशी असलेली पाहायला मिळत आहे. भाजपाच्या सभेतील धक्कादायक प्रकारामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

    राजस्थानातील वल्लभनगर विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या युवक संमेलनात प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांच्या हस्ते तरुणांना वीर शिरोमणी महाराणा प्रतापांच्या प्रतिमा देण्यात आल्या. मात्र त्या स्वीकारल्यानंतर मंचावर बसलेल्या पदाधिकारी आणि पाहुण्यांच्या पायांजवळ त्या प्रतिमा ठेवण्यात आल्या. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

    अनेकांचे टीकास्त्र
    भाजपाच्या सभेतील फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी पक्षावर टीकास्त्र सोडले आहे. भाजपाने महाराणा प्रतापांचा अपमान केला असल्याचे म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. तसेच भाजपाचे नेते मंडळी मंचावर उपस्थित असताना हा धक्कादायक प्रकार घडल्याने टीकास्त्र सोडले जात आहे. याप्रकरणी भाजपाच्या नेत्यांनी जाहीरपणे जनतेची माफी मागितली आहे. मात्र तरीदेखील हा वाद शांत होत नाही. महाराणा प्रताप यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे म्हणत सोशल मीडियावरही भाजपावर हल्लाबोल केला जात आहे.

    मागितली माफी
    माजी मंत्री आणि खासदार सी. पी. जोशी यांनी सर्वांत पहिल्यांदा एक व्हीडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करून याबाबत जनतेची जाहीर माफी मागितली. नकळतपणे ही चूक झाली आहे त्याबद्दल आम्ही जनतेची माफी मागतो असे त्यांनी या व्हीडिओमध्ये म्हटले आहे. भाजपाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून याबाबत माफी मागण्यात आली आहे. महाराणा प्रताप संपूर्ण भारतवर्षासाठी आदरणीय आणि अभिमान वाटावे असे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याबद्दल आपणा सर्वांच्याच मनात प्रचंड आदर आहे. आमच्या चुकीबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो, असे म्हटले आहे.