महाराष्ट्राचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलीसांनी घेतले ताब्यात

उत्तर प्रदेशच्या आझमगडमधील बांसा या गावात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला दलित सरपंचाची हत्या झाली होती. या गावातील सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी झाडून अमानूष हत्या करण्यात आली. नितीन राऊतांना समजल्यावर ते सत्यमेव जयते यांच्या कुटुंबाला भेटून सांत्वन करण्यासाठी जात होते. परंतु सीमेवरच त्यांना आडवण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश : काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत उत्तर प्रदेश दौऱ्यावर होते. त्यांना उत्तरप्रदेशच्या आझमगड पोलीसांना ताब्यात घेतला आहे. नितीन राऊत यांना आझमगडच्या सीमेवर पोलीसांनी आडवले होते. त्यांनी आझमगडमध्ये प्रवेश करु द्या असे पोलीसांना सागितले. पोलीसांनी परवानगी नसल्याने उर्जामंत्री नितीन राऊत यांना ताब्यात घेतले आहे. नितिन राऊत यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह आझमगडच्या सीमेवर ठिय्या आंदोलन केले. बांसा येथे जाण्यास परवानगी द्यावी असे समर्थकांची मागणी केली. 

काय आहे प्रकरण

उत्तर प्रदेशच्या आझमगडमधील बांसा या गावात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला दलित सरपंचाची हत्या झाली होती. या गावातील सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी झाडून अमानूष हत्या करण्यात आली. नितीन राऊतांना समजल्यावर ते सत्यमेव जयते यांच्या कुटुंबाला भेटून सांत्वन करण्यासाठी जात होते. परंतु सीमेवरच त्यांना आडवण्यात आले आहे. 

या प्रकरणाबाबत पडताळणी करण्यासाठी काँग्रेस सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी एक समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांचा समावेश आहे. तसेच उत्तर प्रदेश काँग्रेसचचे प्रमुख अजय कुमार लल्लू आणि काँग्रेस खासदार पीएल पुनिया यांचा देखील समितीमध्ये समावेळ आहे. 

देशात अनुसूचित जाती-अनुसूचित जमातींवरील अत्याचारांचे अनेक गंभीर प्रकरणे समोर आली आहेत. डॉ राऊत यांनी अखील भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारले आहे. त्यामुळे त्यांना पदभार स्वीकारल्यानंतर याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. देशातील दलितांवरील अत्याचाराविरोधात राऊत आक्रमक झाले आहेत.