mamata banerjee

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. पश्चिम बंगाल सरकार राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला आता मोफत लस(free corona vaccine in west bengal) देणार आहे.

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. पश्चिम बंगाल सरकार राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला आता मोफत लस(free corona vaccine in west bengal) देणार आहे. दक्षिण दिनाजपूर भागातल्या एका सभेत त्यांनी ही घोषणा केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ५ मेपासून राज्यात जे कोणी पात्र असतील त्या सर्वांना लस पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे. ममता यांनी नुकतंच लसींच्या नव्या किमतींवरुन केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते.

    त्या म्हणाल्या होत्या, “भाजपा कायम एक देश, एक पक्ष, एक नेता असं ओरडत असतं. पण लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ते लसीची एक किंमत मात्र ठरवू शकत नाहीत. प्रत्येक भारतीयाला मोफत लस मिळायला हवी. यासाठी त्यांचं वय, जात, पंथ, स्थळ अशा कोणत्याही मर्यादा नकोत. खर्च केंद्र करो किंवा राज्य, पण भारत सरकारने देशभरात करोना प्रतिबंधक लसीची एकच किंमत ठरवून द्यायला हवी.”

    ममता यांनी लसीच्या एका किमतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्रही लिहिलं आहे.