mamata banerjee oath taking

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी(Mamata banerjee angry) यांनी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ(Mamata banerjee oath taking ceremony) घेतली. राज्यपाल जगदीप धनखार यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी सोहळ्यानंतर राजभवनातच ममता बॅनर्जी राज्यपालांवर संतापल्याचे पाहायला मिळाले.

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात हिंसाचार उफाळून आला आहे. भाजपा-तृणमूल यांच्याकडून एकमेकांवर हिंसाचाराचे आरोप होत आहेत. अशातच  तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल जगदीप धनखार यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ(Mamata banerjee Oath Taking) दिली. शपथविधी सोहळ्यानंतर राजभवनातच ममता बॅनर्जी राज्यपालांवर संतापल्याचे पाहायला मिळाले.

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत२१३ जागा जिंकणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अत्यंत साधेपणाने हा सोहळा पार पडला.

    शपथ घेतल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या, “कोरोना संकट नियंत्रणात आणण्याला सरकार प्राधान्य देणार आहे. याचसंदर्भात दुपारी बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर तीन वाजता पत्रकार परिषद घेऊ. सगळ्याच राजकीय पक्षांनी सध्या शांतता राखावी.

    त्यानंतर राज्यपालांनी बंगालमधील हिंसाचाराकडे ममतांचं लक्ष वेधलं.

    राज्यपाल म्हणाले की, “निवडणूक निकालानंतर उसळेला संवेदनाहीन, भयंकर हिंसाचार संपवणे हीच आपली प्राथमिकता आहे. मला पूर्ण खात्री आहे की, कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री तत्काळ पावलं उचलतील. या परिस्थितीत माझी छोटी बहीण कारवाई करेल, अशी मला आशा आहे. सरकार संविधान आणि कायद्यानुसार काम करून संघराज्य पद्धतीचा सन्मान करेल.”

    राज्यपालांनी मांडलेल्या भूमिकेवर ममता बॅनर्जी यांनी उत्तर दिलं. राज्यपालांच्या हातातील माईक हातात घेऊन ममता संतापून म्हणाल्या,“मी आजच शपथ घेतली आहे. तीन महिन्यांपासून राज्य पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या हाती होतं. निवडणूक आयोगाने या काळात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. नियुक्त्याही केल्या. ज्यांनी कोणतंही काम केलं नाही. अशा परिस्थितीत आपण कामाला सुरुवात करत आहोत.”