ममता बॅनर्जींना ठोठावला 5 लाखांचा दंड , न्यायालयाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न

जस्टिस चंदा यांनी 24 जूनला निर्णय राखीव ठेवला होता. बुधवारी निर्णय देताना न्यायालयाने म्हटले की, ममतांनी न्यायालयाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जस्टिस चंदा यांनी स्वतः या सुनावणीतून बाजुला होण्याचा निर्णय घेतला आहे.

    कोलकाता: कलकत्ता उच्च न्यायालयाने बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ममता यांनी निवडणुकीसंबंधी एक याचिका दाखल केली होती, त्या याचिकेच्या सुनावणीतून जस्टिस कौशिक चंदा यांना हटवण्याची मागणी केल्यामुळे ममतांवर ही कारवाई झाली आहे.

    ममतांनी जस्टिस चंदा यांच्यावर भाजपशी संबंध असल्याचा आरोपही लावला होता. ममता म्हणाल्या होत्या की, ‘जस्टिस चंदा यांचा एक फोटो समोर आला आहे, त्यात त्या भाजप नेत्यांसोबत दिसत आहेत. त्यांचे भाजपसोबत जवळचे संबंध आहेत, त्यामुळे त्यांना या खटल्याच्या सुनावणीतून हटवण्यात यावे.