मुख्यमंत्री म्हणून ४३ टक्के लोकांची पसंती ममता बॅनर्जींनाच ?  ; कोण असावा मुख्यमंत्रीपदाचा नवा चेहरा?

या एक्झिट पोलनुसार, मुख्यमंत्रीपदासाठी बंगालमधील जनतेची पसंती अजूनही ममता बॅनर्जी यांनाच आहे. ममता बॅनर्जी गेल्या दहा वर्षापासून बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. एकीकडे तृणमूल काँग्रेस भाजपमुळे अडचणीत असल्याचं चित्र असतानाच दुसरीकडे ममता बॅनर्जींचा दबदबा मात्र कायम आहे.

    कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Election 2021) निकालाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार (West Bengal Assembly Election 2021 Exit Poll) भाजपचे दावे काही प्रमाणात खरे ठरत असल्याचं चित्र दिसत आहे.

    या एक्झिट पोलनुसार, मुख्यमंत्रीपदासाठी बंगालमधील जनतेची पसंती अजूनही ममता बॅनर्जी यांनाच आहे. ममता बॅनर्जी गेल्या दहा वर्षापासून बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. एकीकडे तृणमूल काँग्रेस भाजपमुळे अडचणीत असल्याचं चित्र असतानाच दुसरीकडे ममता बॅनर्जींचा दबदबा मात्र कायम आहे.

    ममता बॅनर्जींनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती मिळाली आहे. ६% लोक त्यांना मुख्यमंत्री पदावर पाहू इच्छितात. तर, शुभेंदु अधिकारी यांच्याशिवाय मिथुन चक्रवर्ती आणि बाबुल सुप्रियो यांच्यासारखे भाजपचे मुख्य चेहरेही या शर्यतीत बरेच मागे असल्याचं चित्र आहे. तर, भाजपमधील कोणताही चेहरा चालेल याला २६% टक्के लोकांची पसंती आहे.