ममता बॅनर्जी देशातील मोठ्या पक्षाला धक्का देण्याची शक्यता ; भाजपचा बडा नेता घरवापसीच्या तयारी

भाजपमध्ये सत्तेच्या आशेनं गेलेल्या नेत्यांची आता चलबिचल सुरू झाली आहे. अनेक नेते तृणमूलमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये मुकूल रॉय यांचा क्रमांक वरचा आहे. मुकूल रॉय यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये तृणमूलला रामराम केला होता. मात्र आता ते तृणमूलमध्ये पुन्हा प्रवेश करू शकतात.

    तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देशातील मोठ्या पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय, त्यांचा मुलगा सुभ्रांशु रॉय तृणमूलमध्ये घरवापसी करण्याची शक्यता आहे.  मुकूल रॉय आज संध्याकाळी ममता बॅनर्जींची पक्ष मुख्यालयात भेट घेतील. या बैठकीला अभिषेक बॅनर्जीदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

    विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलला मोठी गळती लागली होती. अनेक आमदारांनी हाती कमळ घेतलं. मात्र तरीही तृणमूलनं २०० हून अधिक जागा जिंकत राज्यात हॅटट्रिक साधली.