हिंमत असेल तर भाजपाने राष्ट्रगीत बदलून दाखवावं, ममता बॅनर्जींचं मोदी सरकारला खुलं आव्हान

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा (BJP) आणि मोदी सरकारवर हल्लाबोल (Attack) केला आहे. दरम्यान, हिंमत असेल तर भाजपाने राष्ट्रगीत बदलून दाखवावं, असं खुलं आव्हान ममता बॅनर्जींनी मोदी सरकारला (Mamata Banerjee openly challenges Modi government)  दिलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये ( West Bengal ) आगामी वर्षात विधानसभा निवडणुकीची ( Assembly elections ) लगबग सुरू होणार आहे. परंतु निवडणुकीपूर्वीच राजकीय पडसाद चांगलेच उमटू लागले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा (BJP) आणि मोदी सरकारवर हल्लाबोल (Attack) केला आहे. दरम्यान, हिंमत असेल तर भाजपाने राष्ट्रगीत बदलून दाखवावं, असं खुलं आव्हान ममता बॅनर्जींनी मोदी सरकारला (Mamata Banerjee openly challenges Modi government)  दिलं आहे.

राष्ट्रगीत बदलण्यासंदर्भात भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक पत्र लिहिलं होतं. यावरही ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर भाजपाने असं काही करण्याचा प्रयत्न केला तर राज्यातील जनता त्यांना योग्य ते उत्तर देईल. ते आपल्या देशाचा इतिहास बदलू इच्छित आहेत. आपलं राष्ट्रगीत बदलण्याच्या गोष्टी करत आहेत, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

ममता बॅनर्जी यांनी सीएए आणि एनपीआरच्या मुद्द्यावरही भाष्य केलं आहे. सीएए आणि एनपीआरमुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही. आम्ही पश्चिम बंगालमध्ये निर्वासितांच्या कॉलनींना मान्यता दिली आहे. भाजपा कधीही गोरखा लँडबाबत समस्येचा कायमस्वरूपी तोडगा काढू शकत नाही. केवळ तृणमूल काँग्रेसचं असं करू शकते असंही त्या म्हणाल्या आहेत.