ईडीने भाच्याला समन्स बजावल्यावर ममता बॅनर्जींनी व्यक्त केला संताप, म्हणाल्या…

ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी(ED Summons To Abhishek Banerjee) तसंच त्यांच्या पत्नी रुजीरा यांना कथित कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडीने समन्स(ED Summons) बजावलं आहे. त्यानंतर ममतांनी कालीघाट येथे तृणमूल विद्यार्थी परिषद स्थापना दिनानिमित्त आयोजित मेळाव्यामध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    केंद्र सरकार तृणमूल काँग्रेसविरोधात(Trunmul Congress) तपास यंत्रणांचा वापर करत आहे . पक्षाशी राजकीय लढाई लढू शकत नाहीत म्हणून ते असं करत आहेत, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) यांनी केला आहे. ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी(ED Summons To Abhishek Banerjee) तसंच त्यांच्या पत्नी रुजीरा यांना कथित कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडीने समन्स बजावलं आहे. त्यानंतर ममतांनी कालीघाट येथे तृणमूल विद्यार्थी परिषद स्थापना दिनानिमित्त आयोजित मेळाव्यामध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    त्या पुढे म्हणाल्या, “लोकांसाठी काम करण्यास आम्ही प्राधान्य देतो. जेव्हा दिल्लीतील भाजपा सरकार राजकारणात आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही, तेव्हा ते तपास यंत्रणांचा वापर करतात. काही लोक आम्हाला सोडून गेले होते पण आता ते परत आले आहेत कारण त्यांना माहित आहे की हा पक्ष  त्यांचे घर येथे आहे.

    त्या पुढे म्हणाल्या की, “भाजपचे मंत्री कोळसा माफियांच्या हाताशी आहेत. मी माझ्या राजकीय जीवनात असा सूडबुद्धीने चालणारा पक्ष आणि सरकार कधीच पाहिलं नाही. तुम्ही आम्हाला ईडीचा धाक दाखवल्यास, आम्ही भाजपा नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडे पुरावेही पाठवू.” राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि इतर सर्व आयोग राजकीय झाले आहेत आणि त्यांचे सर्व सदस्य भाजपचे असल्याचेही ममता यांनी म्हटले.

    दरम्यान, अभिषेक बॅनर्जी म्हणाले, “भाजपाला वाटते की ते ईडीचा वापर करून आमच्यावर दबाव आणू शकतात परंतु आम्ही अधिक मजबूत होऊ.”