ममता बॅनर्जी व्हिलचेअरवरून करणार प्रचार; विधानसभेच्या रणांगणात विरोधकांना थेट भिडण्याचा निर्धार

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदिग्रामच्या हल्ल्यानंतरही विधानसभेच्या रणांगणात विरोधकांना थेट भिडण्याचा निर्धार केला आहे. हल्ल्यात गंभीर दुखापत झाली आहे. दोन-तीन दिवसांत चालू शकेन अशी आशा आहे.

    कोलकाता (Kolkata).  तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदिग्रामच्या हल्ल्यानंतरही विधानसभेच्या रणांगणात विरोधकांना थेट भिडण्याचा निर्धार केला आहे. हल्ल्यात गंभीर दुखापत झाली आहे. दोन-तीन दिवसांत चालू शकेन अशी आशा आहे. दुखणे कायम राहिले तरी मॅनेज करेन. प्रचारासाठी व्हिलचेअरची मदत घेईन, पण एकही सभा चुकवणार नाही, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी विरोधकांना सणसणीत इशारा दिला आहे. त्यांनी प्रचारादरम्यान मुक्कामासाठी नंदिग्राममध्येच घर भाड्याने घेतले आहे.

    नंदिग्राममध्ये निवडणूक प्रचार करीत असताना ममता बॅनर्जींना बुधवारी दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तातडीने ग्रीन कॉरिडॉर करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी त्यांना एसएसकेएम रुग्णालयाच्या दुसऱ्या इमारतीत हलवण्यात आले. येथे उपचार घेत असताना त्यांनी एक व्हीडिओ जारी करून आपल्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. नंदिग्राममधून निवडणूक लढवणे हा ममतादीदींचा ‘मास्टरस्ट्रोक’ मानला जात आहे.

    निवडणुकीतून मिथुनदाची माघार
    बंगालच्या निवडणूक रणांगणात बॉलिवूड अभिनेता व नुकतेच भाजपामध्ये आलेले मिथुन चक्रवर्ती यांनी न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. भाजपा प्रदेश प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले की, मिथुनशी माझी चर्चा झाली असून त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. जर पक्षाचा निर्णय झाला तर पुन्हा त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल.

    त्यांना निवडणूक लढवायची असेल, तर त्यांना लढवू देऊ. मिथुन भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसणार आहेत. भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांचे नाव आहे. डाव्या पक्षातून आपले राजकारण सुरू करणाऱ्या चक्रवर्तींनी टीएमसीतून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी 7 मार्चला भाजपाची सदस्यता घेतली.