चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय, इंडस्ट्रीशी निगडित असणाऱ्यांनी केलं सरकारचं अभिनंदन

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील पाच महिन्यांपासून देशभरातील चित्रपटगृहे (theaters) बंद करण्यात आली आहे. परंतु कोरोनाच्या या संकाटामध्येही पश्चिम बंगालमध्ये (west bengal) एक ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. काल शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोना विषाणूचे संकट (corona virus)  दिवसागणिक वाढत आहे. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील पाच महिन्यांपासून देशभरातील चित्रपटगृहे (theaters) बंद करण्यात आली आहे. परंतु कोरोनाच्या या संकाटामध्येही पश्चिम बंगालमध्ये (west bengal) एक ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. काल शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.

सामन्य परिस्थितीकडे जाताना जत्रा, नाटक, ओएटी, चित्रपटगृह, म्यूजिकल व नृत्य कार्यक्रम आणि मॅजिक शोला एक ऑक्टोबर पासून परवानगी देण्यात येत आहे. पण या सर्व ठिकाणी ५० पेक्षा कमी जणांची उपस्थिती असायला हवी. यादरम्यान सर्वांनी सोशल डिस्टेन्सिंगचे (सामाजिक अंतर) पालन करायला हवं. शिवाय मास्क आणि इतर नियमांचेही पालन करावे, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून सांगितले आहे.

चित्रपटगृह आणि इतर मनोरंजन कार्यक्रम बंद असल्यामुळे व्यावसायिक कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे चित्रपटगृहे सुरु करावीत अशी मागणी चित्रपट इंडस्ट्रीशी निगडित असलेली लोकं, TMC खासदार, नुसरत जहाँ, मिमी चक्रवर्ती आणि अन्य लोकांनी केली होती. त्यानंतर अखेर ममता बॅनर्जी यांनी चित्रपट गृहाबाबत मोठा निर्णय घेतला. चित्रपटगृहे सुरु करण्याच्या निर्णयावर अनेक नेता अन् चित्रपट इंडस्ट्रीशी निगडित असणाऱ्यांनी ममता बॅनर्जी सरकारचे अभिनंदन केलं आहे.