एका पायावर बंगाल…दोन पायांवर दिल्लीही जिंकेन; ममता बॅनर्जींची पंतप्रधान होण्याचा मानस?

नंदीग्राम येथे ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली होती. यासाठी त्यांनी भाजपाला जबाबदार धरले होते. मात्र, हुगळी येथे बोलताना याचाच आधार घेत, आता एका पायावर पश्चिम बंगाल जिंकेन आणि पुढे नंतर दोन्ही पायांवर दिल्लीही जिंकेन, असा दावा केला आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान होण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

    कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये आठपैकी दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून प्रचारसभांना आणखी वेग आला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली असली, तरी त्या प्रचारसभांना आवर्जुन हजेरी लावत असल्याचे दिसत आहे. हुगळी येथे झालेल्या प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

    नंदीग्राम येथे ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली होती. यासाठी त्यांनी भाजपाला जबाबदार धरले होते. मात्र, हुगळी येथे बोलताना याचाच आधार घेत, आता एका पायावर पश्चिम बंगाल जिंकेन आणि पुढे नंतर दोन्ही पायांवर दिल्लीही जिंकेन, असा दावा केला आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान होण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

    बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुका घेण्यामागे भाजपावाल्यांचे कारस्थान आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी यावेळी बोलताना केला. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान घेण्याची गरजच नव्हती, असा पुनरुच्चार ममता बॅनर्जी यांनी केला आहे.