कमळ फुलणार की उमलणार? पीएम मोदी आणि अमित शाह यांना टक्कर देण्यासाठी ममता बॅनर्जींची नवी खेळी

पश्चिम बंगालमधील जनतेसाठी कोरोनासंदर्भात सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. या निर्णयाचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी होणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोरोनाची लस मोफत देण्याबाबत घोषणा केली आहे

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आता निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांना सत्तेतून बाहेर करण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यामध्ये फारसे मागे नाहीत. याच दरम्यान आता ममता बॅनर्जी यांनी काउंटर स्ट्रॅटेजी म्हणून मोठी घोषणा केली आहे. भाजपचं कमळ फुलू न देण्यासाठी पीएम मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टक्कर देण्यासाठी आता ममता बॅनर्जींनी नवी खेळी केली आहे.

पश्चिम बंगालमधील जनतेसाठी कोरोनासंदर्भात सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. या निर्णयाचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी होणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोरोनाची लस मोफत देण्याबाबत घोषणा केली आहे. राज्यातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्याबाबत राज्य सरकार नियोजन करत असल्याची माहिती ममत बॅनर्जी यांनी ट्वीट करून दिली आहे.

देशात १६ जानेवारीपासून प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा कंदील दिल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज ही मोठी घोषणा केली आहे.