ममता बॅनर्जी यांचं एकीकडे भाषण आणि दुसरीकडे नंदीग्राममधून पराभव

भाजपाचा पराभव झाला आहे. त्यांनी घाणेरडं राजकारण केलं. आम्ही निवडणूक आयोगाकडून खूप त्रास सहन केला असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. नंदीग्रामबद्दल चिंता करु नका, आम्ही एक लढा दिल्याने मला तिथे जास्त संघर्ष करावा लागला. तेथील लोक जो कौल देतील तो मला मान्य आहे. आम्ही २२१ हून जास्त जागा जिंकल्या असून भाजपाचा पराभव झाला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

    कोलकाता: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तृणमूल काँग्रेसने २०० हून अधिक जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर दुसरीकडे कडवं आव्हान देत जोरदार प्रचार केलेल्या भाजपाच्या हाती मोठी निराशा आली आहे. भाजपाची शंभरी पूर्ण करतानाही दमछाक झाली आहे. अद्याप निवडणुकीच्या अधिकृत निकालाची घोषणा झालेली नाही, मात्र ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅटट्रिक साधल्याचं चित्र स्पष्ट आहे.

    ममता नंदीग्राममधून पराभूत झाल्या आहेत. तसेच नंदीग्राममध्ये काय झाले ते विसरुन जा, बंगालमध्ये विजय मिळवला आहे. असं ममता बॅनर्जी आपल्या भाषणात म्हणाल्या आहेत. त्यांनी नंदग्राममधील पराभव स्वीकारला असून हा विजय बंगालींचा, देशाचा आणि लोकशाहीचा आहे. असेही त्या म्हणाल्या आहेत.

    ममता बॅनर्जींची पत्रकार परिषद