Mamata Didi's power in Bengal; Trinamool's 'Bahubali' in custody

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये धुरळा उडाला आहे. मतदान सुरू होण्याच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसचा बाहुबली नेते अनुब्रत मंडल यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. त्यांना मंगळवार सायंकाळी ५ वाजल्यापासून मतदान संपल्यानंतरचा दुसरा दिवस शुक्रवारच्या सायंकाळी ७ वाजेपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

    कोलकाता : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये धुरळा उडाला आहे. मतदान सुरू होण्याच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसचा बाहुबली नेते अनुब्रत मंडल यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.

    त्यांना मंगळवार सायंकाळी ५ वाजल्यापासून मतदान संपल्यानंतरचा दुसरा दिवस शुक्रवारच्या सायंकाळी ७ वाजेपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे केंद्रीय सुरक्षा दलांचे जवान व एक मॅजिस्ट्रेट डोळ्यात तेल घालून अनुब्रत मंडलवर लक्ष ठेवून आहेत. अनुब्रत मंडल हे बीरभूम जिल्ह्याचे तृणमूलचे अध्यक्ष आहेत.

    धक्कादायक म्हणजे नजरकैदेत असूनही मंडल हे सुरक्षा दलाच्या जवानांच्या डोळ्यात धूळ फेकत काही तास गायब झाल्याने खळबळ उडाली होती.

    दरम्यान, बंगालमध्ये २९२ जागांवर मतदान झाले. त्यापैकी १५०ते १७२जागांवर तृणमूलला विजय मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात भाजपाच्या जागा वाढणार असून १३२ जागांपर्यंत भाजपा मुसंडी मारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेस-डाव्यांना मात्र सर्वच एक्झिट पोलने १०-१५ जागाच मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.