ममतांच्या १५० सभा आणि ४४ दिवस व्हिलचेयरवरुन प्रचार, मोंदीच्या २० सभा तर अमित शहांनी ७० रॅली काढल्या

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने आपली संपूर्ण ताकत पणाला लावली आहे. भाजपाने मोठ्या प्रमाणावर प्रचार केला आहे. ममता बॅनर्जींकडून पश्चिम बंगाल काढून घेण्यासाठी भाजपाने सर्वोतोपरी प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. कोरोना संकटात जरी या निवडणुका पार पडल्या असल्या तरी प्रचारसभांमध्ये काहीही कमतरता जाणवली नाही. अनेक दिग्गजांनी प्रचार सभांमध्ये भाग घेतल्याचे पाहायला मिळाले. प्रचार सभांमध्येही ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपा अशी थेट लढत दिसून आली.

    कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने आपली संपूर्ण ताकत पणाला लावली आहे. भाजपाने मोठ्या प्रमाणावर प्रचार केला आहे. ममता बॅनर्जींकडून पश्चिम बंगाल काढून घेण्यासाठी भाजपाने सर्वोतोपरी प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. कोरोना संकटात जरी या निवडणुका पार पडल्या असल्या तरी प्रचारसभांमध्ये काहीही कमतरता जाणवली नाही. अनेक दिग्गजांनी प्रचार सभांमध्ये भाग घेतल्याचे पाहायला मिळाले. प्रचार सभांमध्येही ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपा अशी थेट लढत दिसून आली.

    बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी प्रचार फेऱ्यांचा सपाटा लावल्याचे पाहायला मिळाले. बंगालमध्ये टीएमसीची प्रमुख नेतेमंडळी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक प्रचारात ४४ दिवस व्हिलचेयरवर प्रचारात उतरल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी टीएमसी उमेदवाराच्या समर्थनार्थ ममता बॅनर्जी यांनी सुमारे १५० जाहीर सभांना संबोधित केले तर त्यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी हे रोड शो आणि जाहीर सभांच्या माध्यमातून प्रचार करताना दिसले.

    बंगालमध्ये भाजपाच्या वतीने अगदी जोरात प्रचार सुरू होता. भाजपाच्या पहिल्या ओळीचे नेते तळ ठोकून होते. पंतप्रधान मोदींनी बंगालमध्ये सुमारे २० जाहीर सभा घेतल्या. यातील बऱ्याच सभा या मतदानाच्या दिवशी होत्या. यावर टीएमसीनेही आक्षेप घेतला तर अमित शहा यांनी सुमारे ७० रॅली काढल्या. काही सभाही त्यांनी घेतल्या. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा हेदेखील प्रचारात उतरले होते तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील काही सभा घेतल्या.

    भाजपा नेते राजनाथ सिंह, सिने अभिनेता मिथुन चक्रवर्ती हेदेखील भाजपाच्या वतीने प्रचारासाठी मैदानात उतरले होते. सर्व राज्यांच्या महिला अध्यक्षही प्रचारात होत्या तर महाराष्ट्रातून विजया रहाटकर, विनोद तावडे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, गिरीष महाजन हेदेखील बंगालमध्ये प्रचारासाठी पोहोचले होते.