ममता बॅनर्जींना भाजपचे आव्हान, ममतांनी आव्हान स्विकारलं

ममता बॅनर्जींनी २०१९ साली संयुक्त आघाडीची भाषा केली होती, त्याचं काय झालं? दिल्लीतील केंद्र सरकार पाडण्याची भाषा केली होती, त्याचं काय झालं? असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय. भाजपचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी नंदिग्राममध्ये बोलताना हा सवाल उपस्थित केला. याला आता ममता बॅनर्जींनी उत्तर दिलंय. 

    पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचा प्रचार सध्या जोरदार रंगू लागला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपा या मुख्य प्रतिस्पर्ध्यांमध्ये जोरदार स्पर्धा असून एकमेकांना आव्हानं आणि प्रतिआव्हानं देण्याची जणू शर्यतच लागल्याचं चित्र निर्माण झालंय.

    ममता बॅनर्जींनी २०१९ साली संयुक्त आघाडीची भाषा केली होती, त्याचं काय झालं? दिल्लीतील केंद्र सरकार पाडण्याची भाषा केली होती, त्याचं काय झालं? असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय. भाजपचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी नंदिग्राममध्ये बोलताना हा सवाल उपस्थित केला. याला आता ममता बॅनर्जींनी उत्तर दिलंय.

    बंगाल विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आपण दिल्लीकडे वळणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केलीय. भाजपने आपली कॉपी करणं सोडून द्यावं, असं सांगतानाच आपण पश्चिम बंगालमधील विजयानंतर दिल्लीकडं मोर्चा वळवणार असल्याचं सांगत त्यांनी भाजपचं आव्हान स्विकारलंय. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्यात शाब्दिक यु्द्ध रंगल्याचं चित्र दिसतंय.

    भाजपने यावेळी आपली पूर्ण ताकद पश्चिम बंगालमध्ये पणाला लावली असून तृणमूल काँग्रेसमधील अनेक नाराजांनी भाजपात प्रवेश केलाय. अनेक आजी माजी खासदार आणि आमदार भाजपच्या गळाला लागले असून पश्चिम बंगालमध्ये सत्तापालट करण्यासाठी भाजपने कंबर कसलीय. भाजपचे चाणक्य अशी ओळख असणारे अमित शाह सध्या बंगालच्या निवडणुकीवर लक्ष ठेऊन आहेत आणि आगामी काळात पश्चिम बंगालमध्ये प्रचाराचा चांगलाच धुरळा उडणार असल्याचं चित्र आहे.