ममतांवरील हल्ल्याचं राजकारण नको, भाजपची भूमिका, केंद्राला अधिक कुमक पाठवण्याची विनंती

ममता बॅनर्जींवर झालेला हल्ला हा निषेधार्ह असून त्याचं राजकारण करणं चुकीचं आहे. ही घटना क्लेशकारक असून केंद्र सरकारनं अधिक कुमक पश्चिम बंगालमध्ये पाठवावी, अशी विनंती आपण करणार असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी दिलीय. बंगालमधील वाढता राजकीय हिंसाचार चिंताजनक असल्याचंदेखील त्यांनी म्हटलंय. 

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर झालेला हल्ला, ममता बॅनर्जी जखमी होणं आणि त्यानंतर आजचा (गुरुवार) रद्द करण्यात आलेला तृणमूलचा जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम याची सध्या जोरदार चर्चा होतेय. या पार्श्वभूमीवर अशा घटनांचं राजकारण करणं चुकीचं असल्याचा आरोप भाजपनं केलाय.

    ममता बॅनर्जींवर झालेला हल्ला हा निषेधार्ह असून त्याचं राजकारण करणं चुकीचं आहे. ही घटना क्लेशकारक असून केंद्र सरकारनं अधिक कुमक पश्चिम बंगालमध्ये पाठवावी, अशी विनंती आपण करणार असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी दिलीय. बंगालमधील वाढता राजकीय हिंसाचार चिंताजनक असल्याचंदेखील त्यांनी म्हटलंय.

    आज (गुरुवारी) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते तृणमूल काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन होणार होतं. यासाठी एका भव्य कार्यक्रमाचं आणि पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र बुधवारी ममता बॅनर्जी जखमी झाल्यामुळे त्या या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आज होणारा हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतलाय. लवकरच कार्यक्रमाची नवी तारीख जाहीर केली जाणार आहे.

    बॅनर्जी या आज बुधवारी नंदिग्राममध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. नेमके काय घडले हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सुरक्षारक्षकांनी ममतांना उचलून मोटारीत बसवल्याचे दिसले.

    या हल्ल्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. आज रात्री नंदिग्राममध्ये मुक्काम करण्याचे ममतांचे नियोजन होते. मात्र, या हल्ल्यानंतर त्या थेट कोलकत्याकडे रवाना झाल्या. दम्यान, कारजवळ उभी असता काही लोकांनी धक्का दिला असे ममता म्हणाल्या.