रोजच्या ‘त्या’ त्रासामुळे पत्नी त्याच्यावर चिडली, मग काय पठ्ठ्याने घरातच विहिर खोदली

गुनामधील पतीने आपल्या पत्नीला होणारा त्रास पाहून एक अनोखे काम केले आहे.(man created well at home) अनेकदा पत्नीला नेमके काय हवे, (well for wife)हेच पतीच्या लक्षात येत नसल्याची महिलांची तक्रार असते. मात्र या पठ्ठ्याला आपल्या पत्नीला नेमके काय हवे, हे कळून चुकले.

गुना: तुझ्यासाठी आकाशातून चंद्र-तारे तोडून आणेन असे अनेकदा प्रियकर किंवा पती आपल्या साथीदाराला म्हणत असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रेमात पाताळातून पाणी काढण्याबाबत पहिल्यांदाच ऐकले असेल. ही कोणा पुस्तकातील कहाणी नाही, तर सत्य आहे. मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील एका सर्वसाधारण व्यक्तीने दशरथ मांझीची आठवण करुन दिली आहे. दशरथ मांझीने आपल्या पत्नीच्या प्रेमाखातर २५ फूट डोंगर कापून रस्ता तयार केला होता. अशाच प्रकारे गुनामधील पतीने आपल्या पत्नीला होणारा त्रास पाहून एक अनोखे काम केले आहे.(man created well at home) अनेकदा पत्नीला नेमके काय हवे, (well for wife)हेच पतीच्या लक्षात येत नसल्याची महिलांची तक्रार असते. मात्र या पठ्ठ्याला आपल्या पत्नीला नेमके काय हवे, हे कळून चुकले. आज त्याच्या कामाचे देशभरात कौतुक होत आहे.

गुना जिल्ह्यातील चाचौडा जनपदमधील भानपुर बाबा गावातील आहे, जेथे राहणाऱ्या ४६ वर्षीय भरत सिंहने पत्नीचा त्रास दूर करण्यासाठी घरातच विहिर खोदली. भरत सिंह याची पत्नी सुशीलाबाई रोज ५०० मीटर लांब जाऊन हँडपंपाने पाणी भरत होती. यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागत होता. त्यातच एकेदिवशी हा हँडपंप खराब झाला. त्यामुळे पत्नी चिडली, आणि पाण्याशिवाय घरी परतली. पत्नीला चिडलेल्या अवस्थेत पाहून भरत सिंहने घरातच विहीर खोदण्याचा निर्णय घेतला.

३१ फूट खोल आणि ४ फूट लांब विहीर
भरत सिंहने विलंब न करता फावडा घेतला आणि विहीर खोदायला सुरुवात केली. हे पाहून सुशीलबाई हसू लागली आणि तुम्हाला जमणार नाही असे म्हणत हिणवले. पत्नीचे हे शब्द ऐकून भरत सिंहची हिंमत अधिक वाढली आणि तो विहीर खोदू लागला. १५ दिवसांमध्ये भरतने पत्नीसाठी ३१ फूट खोल आणि  ४ फूट लांब विहीर खोदली. विशेष म्हणजे विहिरीला पाणीही लागले. हे पाहून पत्नी खूश झाली. भरत सिंहने विहीर पक्की करुन घेतली आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्व त्यातून पाणी भरतात. जवळील गावातील नागरिकही भरत सिंहचे कौतुक करीत आहे. गुनाच्या कलेक्टरांनीही भरत सिंहचं कौतुक करीत पीएम आवास व अन्य योजनांअंतर्गत अन्य लाभ देणार असल्याचे सांगितले.