धक्कादायक – मोबाईल चार्ज करायला गेला अन् क्षणात होत्याच नव्हतं झालं, ‘त्या’ वस्तूचा हातातच स्फोट झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

एक २८ वर्षीय तरुण रस्त्याने चालला असताना त्याला पॉवर बँकसारखी वस्तू रस्त्यावर पडलेली दिसली. त्याने ती फोनला कनेक्ट केली आणि क्षणार्धात त्याचा स्फोट(Man Died after Device Blast) झाला.

    मध्यप्रदेशात(Madhya Pradesh) एक विचित्र मृत्यूची घटना घडली आहे. एक २८ वर्षीय तरुण रस्त्याने चालला असताना त्याला पॉवर बँकसारखी वस्तू रस्त्यावर पडलेली दिसली. त्याने ती फोनला कनेक्ट केली आणि क्षणार्धात त्याचा स्फोट(Man Died after Device Blast) झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ही वस्तू काय होती याबद्दल अजूनही काही कळलं नाही.

    मध्यप्रदेशातल्या चपरोड गावात शुक्रवारी ही घटना घडली आहे. मृत राम साहिल पाल हा आपल्या शेताकडे चालला होता.त्यावेळी त्याला रस्त्यावर पॉवर बँक सारखी दिसणारी एक वस्तू सापडली. त्यानंतर काही वेळाने त्याने आपला मोबाईल फोन त्याला जोडला आणि त्यावेळी त्या वस्तूचा स्फोट होऊन राम साहिल पाल याचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे.

    पोलिसांनी ही वस्तू नक्की काय आहे हे तपासण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.