प्रतिकात्मक  फोटो
प्रतिकात्मक फोटो

काही जणांनी कोरोनाच्या भीतीने आपलं आयुष्य संपलवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मध्य प्रदेशातील भोपाळमध्येही(Bhopal) असाच एक प्रकार घडला.

    देशात कोरोना(Corona) रुग्णांच्या मृत्यूची संख्या लक्षणीय आहे. काही जणांनी कोरोनाच्या भीतीने आपलं आयुष्य संपलवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मध्य प्रदेशातील भोपाळमध्येही(Bhopal) असाच एक प्रकार घडला. कोरोनाच्या भीतीने एकजण रॉकेल प्यायला(kerosene Drinking) आणि नंतर जे घडलं ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.

    मध्य प्रदेशातील भोपाळमधल्या अशोक गार्डन भागात महेंद्र हा टेलरिंगचं काम करायचा. काही दिवसांपूर्वी त्याला ताप आला होता.आपल्याला कोरोना झालायं असं त्याला सारखंच वाटायंच. रुग्णालयातील स्थिती पाहता त्याने कोरोनाचा जास्तच धसका घेतला आणि याबाबत आपल्या मित्राला सांगितलं. मित्राने रॉकेल प्यायल्यावर कोरोना बरा होतो असं सांगितलं. महेंद्र लगेच रॉकेल प्यायला.

    रॉकेल प्यायल्याने त्याची प्रकृती आणखी खालवली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  तो उपचारांना साथ देत नसल्याने तिथून त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.

    रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत महेंद्रचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेतले होते. त्यात त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे कुटुंबियांना आणखीच धक्का बसला आहे. मनात शंका होती तेव्हाच जर कोरोना टेस्ट केली असती तर आज ही वेळ आली असते,असे त्यांना आता वाटत आहे.