murder by firing

पवन नावाच्या तरुणाचा गावातील एका तरुणीसोबत विवाह(Marriage) ठरला होता. पण लग्न ठरलेल्या मुलीचं कुलवीर ऊर्फ जसवीर नावाच्या  तरुणासोबत प्रेमसंबंध(Love Affair Before Marriage) सुरू होते.

    श्योपुर : लग्नाला एक दिवस शिल्लक असताना, नवरदेवानं आपल्या होणाऱ्या बायकोच्या प्रियकराला गोळी मारल्याची(Firing Bullet on lover of Wife) घटना समोर आली आहे. नवऱ्या मुलानं होणाऱ्या बायकोचा पिच्छा सोड म्हणत, प्रियकराला आधी दमदाटी केली. पण नवरी मुलगी आपल्यावर प्रेम करते आणि तू तिच्याशी जबरदस्तीनं विवाह करत असल्याचा दावा प्रियकरानं केला. त्यामुळे संतापलेल्या तरुणानं आपल्या प्रियकाराला गोळी मारली आहे. यानंतर त्यानं दुसऱ्या दिवशी त्याच मुलीशी विवाह केला आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    मध्य प्रदेशातील श्योपुरनजीक असणाऱ्या पांडोला गावात ही घटना घडली आहे. या गावातील रहिवासी असणाऱ्या पवन नावाच्या तरुणाचा गावातील एका तरुणीसोबत विवाह ठरला होता. पण लग्न ठरलेल्या मुलीचं कुलवीर ऊर्फ जसवीर नावाच्या  तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू होते. प्रेयसीचं लग्न ठरलं असूनही प्रियकर तिचा पिच्छा करत होता. याची माहिती नवरदेव पवनला मिळाली.

    पवनने होणाऱ्या बायकोच्या प्रियकराला भेटायला बोलवलं. यानंतर पवननं कुलवीरला आपल्या होणाऱ्या बायकोचा पिच्छा सोडायची विनंती केली. तसेच मंगळवारी आपलं लग्न होणार आहे. लग्नात बाधा ठरू नको, असं सांगतिलं पण संबंधित मुलगी आपल्या प्रेम करते. तू तिच्याशी जबरदस्तीनं विवाह करत असल्याचं कुलवीरने सांगितलं. यामुळे संतापलेल्या नवरदेव मुलानं होणाऱ्या बायकोच्या प्रियकरावर गोळी झाडली. या घटनेत प्रियकराच्या कंबरेत गोळी आरपार गेली आहे.

    याप्रकरणी पीडित तरुणानं नवरदेव पवनसह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी लग्न झाल्यानंतर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित पीडित तरुण हा गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्याविरोधात काही गुन्हेही दाखल असल्याची माहितीही समोर आली आहे. जखमी तरुणावर मारहाणीसोबतच छेडछाड केल्याचे गुन्हे दाखल आहे. या घटनेचा पुढील तपास पांडोला पोलीस करत आहेत.