लव्ह, सेक्स और धोका – बायको आणि वडिलांना त्याने विचित्र अवस्थेत पाहिलं अन् त्याला आला राग,कुऱ्हाड काढून….

मुलानेच आपले वडील आणि पत्नीची हत्या(Murder Of Wife And Father) केली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: काकाच्या घरी निघून गेला व त्यांना या घटनेबद्दल त्याने माहिती दिली.

  भोपाळ : जबलपुरमधील(Jabalpur) एका गावातील एक भयानक घटना समोर आली आहे. या घटनेत मुलानेच आपले वडील आणि पत्नीची हत्या(Murder Of Wife And Father) केली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: काकाच्या घरी निघून गेला व त्यांना या घटनेबद्दल त्याने माहिती दिली. कुऱ्हाड घेऊन तो त्यांच्या घराच्या दारावर जाऊन बसला.

  आरोपीने सांगितलं की, पत्नी आणि वडिलांच्या विचित्र नात्यामुळे त्याचा दोघांवर राग होता. तीन दिवसांपूर्वी तरुणाने वडील आणि पत्नीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं. त्याने पत्नी आणि वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र काही उपयोग झाला नाही.

  ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा जबलपूरजवळील बेलखेडातील गोकलाहार गावातील आहे. बेलखोडा टीआय सुनीत श्रीवास्तव म्हणाले, गावातील अर्जुन सिंह लोधीने डबल मर्डरची सूचना दिली. त्याने सांगितलं की, संतोष लोधीने शुक्रवारी रात्री उशिरा वडील आणि पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केली.

  सूचना मिळताच बेलखोडा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचली. संतोष लोधी रक्ताळलेली कुऱ्हाड घेऊन घराच्या दरवाज्यावर बसला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. पोलीस घरात पोहोचले तेव्हा बेडवर वडील अमान सिंह लोधी रक्ताळलेल्या अवस्थेत पडून होते. तर कविता लोधी जमिनीवर पडली होती. दोघांचेही कपडे रक्ताने माखलेले होते. अख्ख्या घरात रक्त पसरलं होतं.

  ताब्यात घेतलेला आरोपी संतोष लोधीने सांगितलं की, वडील आणि पत्नीने मर्यादा ओलांडली होती. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. तीन दिवसांपूर्वी दोघांना आपत्तीजनक अवस्थेत पाहिलं होतं. त्यावेळी पत्नीची समजून काढली होती. मात्र तरीही शुक्रवारी रात्री दोघांनी सीमा ओलांडली. वडिलांना पत्नीच्या खोलीतून निघताना पाहून संतोष चिडला. वडील त्यांच्या खोलीत निघून गेले. आरोपीने कुऱ्हाड उचचली आणि वडिलांच्या मानेवर फिरवली. वडिलांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पत्नीलादेखील निघृणपणे हत्या केली.

  आरोपी संतोष लोधी आणि कवित लोधी यांचं पंधरा वर्षांपूर्वी लग्न झालं होतं.त्यांना एक मुलगा आणि एक मुलगीही आहे.