dog

एका व्यक्तीने शेजारच्या घरातील कुत्र्याला गोळी घालून ठार(Murder of Dog) केलं आहे. शेजाऱ्यांचा पाळीव कुत्रा अरोपीच्या पत्नीला चावल्याने संतापलेल्या या व्यक्तीने कुत्र्याला थेट गोळी घातली.

    इंदूर(Indur) शहरामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका व्यक्तीने शेजारच्या घरातील कुत्र्याला गोळी घालून ठार(Murder of Dog) केलं आहे. शेजाऱ्यांचा पाळीव कुत्रा अरोपीच्या पत्नीला चावल्याने संतापलेल्या या व्यक्तीने कुत्र्याला थेट गोळी घातली.

    नरेंद्र विश्वय्या असं या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. नरेंद्र यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राण्यांची हत्या करण्याच्या गुन्ह्याखाली या नरेंद्र यांना अटक करण्यात आली आहे.

    निवडणुकांमध्ये सातत्याने होणाऱ्या पराभवाबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करायला हवी, असे वाटते का?

    View Results

    Loading ... Loading ...

    कुत्र्याने पत्नीचा चावा घेतल्यानंतर नरेंद्र यांनी कुत्र्यावर गोळी झाडली. ही गोळी कुत्र्याच्या मानेला लागली. गोळीमुळे झालेली दुखापत इतकी गंभीर होती की कुत्रा जागीच मेला. यानंतर कुत्र्याच्या मालकाने पोलिसांना फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी नरेंद्र यांना ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी हा कुत्रा परिसरामधील इतर व्यक्तींनाही यापूर्वी चावलेला आहे असं म्हटलं. पोलिसांनी यासंदर्भात आजूबाजूला चौकशी केली असता नरेंद्र यांनी केलेला दावा खरा ठरला.

    नरेंद्र यांच्या शेजाऱ्याने पाळलेला कुत्रा यापूर्वी येथील काही स्थानिकांना चावल्याच्या दाव्याला आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी दुजोरा दिला. यानंतर पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाविरोधातही तक्रार दाखल केली असून त्याच्याविरोधातही कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. नरेंद्र यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या खासगी बंदुकीमधून हा गोळीबार केला असल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे असणाऱ्या या बंदुकीच्या कागदपत्रांची सत्यता पडताळून पाहण्याचंही काम सुरु केलं आहे.