man saving bird`s life

एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल(Viral Video) होतं आहे. ज्यामध्ये एक तरुण मरायला टेकलेल्या पक्ष्याला वाचवण्याचा प्रयत्न करत (man trying to save a bird) आहे.

    सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या प्रकारचे ‌व्हिडिओ आपण पाहात असतो.त्यातले काही व्हिडिओ आपल्याला भावूक करून जाताता आणि लोकांच्या पसंतीस उतरतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल(Viral Video) होतं आहे. ज्यामध्ये एक तरुण मरायला टेकलेल्या पक्ष्याला वाचवण्याचा प्रयत्न करत (man trying to save a bird) आहे.

    आजकाल कोरोनाच्या भीतीने माणस एकमेकांच्या मदतीला फारशी जाताना दिसत नाहीत. मात्र या पठ्ठ्याने तर चक्क एका पक्ष्याची मदत केली आहे.  त्याने तोंडाने श्वास देऊन मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या पक्ष्याचा प्राण परत आणला आहे.

    हा व्हिडीओ पाहून संबंधित तरुणाचं अनेकजण कौतुक करत आहेत. संबंधित पक्षी एका स्विमिंग पूलाच्या बाजूला शेवटच्या घटका मोजत पडला होता. त्याला श्वास घेता येत नव्हता. कोणत्याही क्षणी पक्षाचा मृत्यू होईल अशी स्थिती निर्माण झाली होती. पण एका तरुणाच्या प्रयत्नांमुळे त्या पक्षाला जीवनदान मिळालं आहे.

    या व्यक्तीने या संपूर्ण बचाव कार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.या पक्षाचं नाव कुकाबुरा आहे. या पक्षाला वाचवण्यासाठी संबंधित तरुण सुरुवातीला पक्षाच्या छातीवर हळुवार दाब देतो. पण याचा फारसा काही फायदा होतं नाही. त्यामुळे संबंधित तरुण कुकाबुरा पक्षाची चोच आपल्या तोंडात ठेवून त्याला मनुष्याप्रमाणे श्वास देण्याचा प्रयत्न करत असल्याचे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो. असाच प्रयत्न दोन तीन वेळा करूनही फारसा फायदा झाला नाही. पण संबंधित व्यक्तीने हार मानली नाही.छातीवर प्रेशर देऊन अथवा तोंडाने श्वास देऊनही काही फरक पडत नसल्याचं त्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने एअर कंप्रेसरने श्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. एअर कंप्रेसरने श्वास दिल्यानंतर हा पक्षी दुसऱ्या क्षणात व्यवस्थित उठून बसला आहे. या पक्ष्याचं नाव जॉर्ज ठेवण्यात आली आहे. तो तरुण आणि पक्ष्यामध्ये आता चांगलीच मैत्री झाली आहे.