cigarette flame in different way

सध्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर ( Viral Video On Social media) व्हायरल होत आहे. या तरुणाने एका छोट्या कामासाठी आपला जीव धोक्यात घातला आहे.

    मुंबई: जगात असे काही लोक असतात ज्यांना काहीतरी वेगळं करायचं असतं. यासाठी ते काहीही करायला तयार असतात. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर ( Viral Video On Social media) व्हायरल होत आहे. या तरुणाने एका छोट्या कामासाठी आपला जीव धोक्यात घातला आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by memes | news | comedy (@ghantaa)

    या तरुणाने एका जीवघेण्या पद्धतीने सिगारेट पेटवण्याचा प्रयत्न केला (Man lighting cigarette on bike tank fire). त्याने लायटरने नाही तर चक्क बाईकच्या (Bike) टँकला आग लावून त्यावर सिगारेट पेटवली आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल (Shocking video).

    व्हिडिओत आपण पाहू शकतो की तरुणाने आपल्या तोंडात सिगारेट धरली आहे. त्यानंतर तो लायटर हातात घेतो आणि बाइकची टाकी उघडून तिथं आग लावतो. त्यानंतर सिगारेट ठेवलेलं आपलं तोंड या आगीजवळ नेतो आणि त्यावर सिगारेट पेटवतो. असं काहीतरी करण्यात या तरुणाला मजा वाटत असेल. आपण काहीतरी डेअरिंगबाज कृत्यं करत आहोत, याचा गर्वही त्याला वाटत असेल. पण तो जे काही करतो आहे, ते जीवघेणंही ठरू शकतं.

    ghantaa इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. काही जणांनी या तरुणाच्या हिंमतीला दाद दिली आहे. तर काहींनी चिंता व्यक्त केली आहे. तर काही जण मजेशीर कमेंटही करत आहेत.तुम्ही असलं काही ट्राय करु नका जीवावर बेतेल.