३० रूपये चोरी केलेला आरोपी ३१ वर्षांनंतर सापडला अन् पुढे काय झालं ते तुम्हीच वाचा

जसवंती (Jaswanti)गावातील रहिवासी करम सिंहनं ३ डिसेंबर १९९० मध्ये कैथल कस्बे येथील ठाण्यात तक्रार दिली होती. यात म्हटलं होतं की, केओरक गावाजवळील एका बस स्टॅण्डवर उभा असतानाच आरोपी त्यांच्याजवळ आला आणि त्यांच्या खिशातून ३० रूपये चोरी(Thief) केले.

    नवी दिल्ली: चोरीचा (Thief Found After 31 years) आरोप असलेल्या एका व्यक्तीला तब्बल ३१ वर्षांनंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. एका शेतकऱ्याच्या खिशातून १९९० मध्ये ३० रूपये चोरी (Steal) केलेल्या आरोपीला पकडण्यात कैथल पोलिसांना (Kaithal Police) ३१ वर्षांनंतर यश आलं आहे.

    पोलिसांनी सुरुवातीला त्याला १९९० मध्येच अटक केली होती आणि त्याच्याकडून चोरीचे पैसेही जप्त करण्यात आले होते. मात्र, डिसेंबर १९९० मध्ये त्याला जामिनावर बाहेर सोडण्यात आलं. यानंतर हरियाणाच्या (Haryana) जिंद जिल्ह्याच्या ध्रोंडी गावात राहाणाऱ्या आरोपी सुभाष चंद याला सप्टेंबर १९९६ मध्ये एका स्थानिक न्यायालयानं फरार घोषित केलं. मात्र, आता त्याला न्यायालयात (Court) हजर केलं असं न्यायाधीश म्हणाले, की त्यानं आधीच तुरुंगात शिक्षा भोगलेली आहे, त्यामुळे त्याला मुक्त करण्यात येत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जसवंती गावातील रहिवासी करम सिंहनं ३ डिसेंबर १९९० मध्ये कैथल कस्बे येथील ठाण्यात तक्रार दिली होती. यात म्हटलं होतं की, केओरक गावाजवळील एका बस स्टॅण्डवर उभा असतानाच आरोपी त्यांच्याजवळ आला आणि त्यांच्या खिशातून ३० रूपये चोरी केले. पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेतली.

    कैथल पोलीस अधिक्षक लोकेंद्र सिंह यांनी सांगितलं की, प्रकरणाच्या माहितीनुसार, एफआयआर दाखल झाल्यानंतर एका दिवसातच पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याच्याकडून चोरी केलेले पैसे जप्त करण्यात आले. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, या अटकेनंतर सुभाषला तुरुंगात पाठवण्यात आलं. मात्र, दुसऱ्याच दिवशी ४ डिसेंबर १९९० रोजी त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आलं. मात्र, यानंतर ते कधीच परतले नाहीत आणि १६ सप्टेंबर १९९६ मध्ये न्यायालयानं त्याला फरारी घोषित केलं.