कोरोनामुळे लॉकडाऊनचे निर्बंध असलेल्या राज्यांची वाढली संख्या, आता हरयाणात ७ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

हरियाणा सरकारने ३ मे पासून सात दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन(7 Days Lockdown in Haryana) घोषित केला आहे. गृहमंत्री अनिल विज यांनी याबाबत घोषणा केली आहे. 

    देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हरियाणा सरकारने ३ मे पासून सात दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन(7 Days Lockdown in Haryana) घोषित केला आहे. गृहमंत्री अनिल विज यांनी याबाबत घोषणा केली आहे.

    या अगोदर शुक्रवारीच राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये वीकेंड लॉकडाउन घोषित करण्यात आला होता. आता संपूर्ण राज्यात सात दिवस कडक लॉकडाऊन असणार आहे. हरियाणात सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. शनिवारी राज्यात १२५ कोरोनाबाधितांचा मृत्यूदेखील झाला आहे.

    याआधी महाराष्ट्र ,दिल्ली, ओडिशा ,कर्नाटक इत्यादी अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर होत असलेल्या राज्यांची संख्या वाढताना दिसत आहे.

    दरम्यान, केंद्र सरकारच्या टास्क फोर्समधल्या काही सदस्यांनी देशभरात कडक लॉकडाऊन लावण्याची भूमिका मांडली आहे.