तमिळनाडूत फुकट आश्वासनांची स्पर्धा, एकमेकांवर मुद्दे चोरल्याचा द्रमुक आणि अण्णाद्रमुकचा आरोप

राजकीय पक्ष जोरदार आश्वासनं आपल्या जाहीरनाम्यात देत असून आपल्या जुन्या चोरल्या जात असल्याचा आरोपही एकमेकांवर करत आहेत. द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपला जाहीरनामा दुसऱ्या पक्षानं चोरल्याचा आरोप केलाय. निवडणुकीच्या तोंडावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष वाटल्या जाणाऱ्या भेटवस्तू हा चर्चेचा विषय ठरलाय. द्रमुकचे निवडणूक रणनिती प्रमुख प्रशांत किशोर आणि अण्णाद्रमुकचे रणनिती प्रमुख सुनील कानुगोलू यांच्यातदेखील यावरून छुपं युद्ध सुरू असल्याची चर्चा आहे.

    देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका या महिन्याच्या शेवटी आणि एप्रिलमध्ये पार पडणार आहेत. नुकतेच तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन्ही पक्षांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केले. यात नागरिकांना अनेक गोष्टी फुकट देण्याचं आश्वासन देण्यात आलंय.

    राजकीय पक्ष जोरदार आश्वासनं आपल्या जाहीरनाम्यात देत असून आपल्या जुन्या चोरल्या जात असल्याचा आरोपही एकमेकांवर करत आहेत. द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपला जाहीरनामा दुसऱ्या पक्षानं चोरल्याचा आरोप केलाय. निवडणुकीच्या तोंडावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष वाटल्या जाणाऱ्या भेटवस्तू हा चर्चेचा विषय ठरलाय. द्रमुकचे निवडणूक रणनिती प्रमुख प्रशांत किशोर आणि अण्णाद्रमुकचे रणनिती प्रमुख सुनील कानुगोलू यांच्यातदेखील यावरून छुपं युद्ध सुरू असल्याची चर्चा आहे.

    वास्तविक, २०१४ मध्ये ‘अब की बार मोदी सरकार’ या कॅम्पेनचा रोड मॅप प्रशांत किशोर आणि सुनील कानुगोलू यांनी एकत्रितपणे तयार केल्याचं सांगितलं जातं. मात्र त्याचं अधिक श्रेय प्रशांत किशोर यांना मिळालं. त्यानंतर हे दोघं वेगवेगळे झाले आणि एकत्र काम करणं त्यांनी थांबवलं. त्यानंतर या दोघांनी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पक्षांसाठी कामे केली.

    तमिळनाडूमध्ये २०१५ पासून २०१९ सालापर्यंत सुनील कानुगोलु हे द्रमुकची प्रतिमा सुधारण्यासाठी झटत होते. त्यानंतर २०२० साली प्रशांत किशोर यांच्याकडे द्रमुकने जबाबदारी दिली. त्यामुळे द्रमुक सोडून सुनील कानुगोलु हे अण्णाद्रमुकमध्ये सहभागी झाले. त्यामुळे सध्या राजकीय पक्षांची लढाई जितकी रंगतदार आहे, तितकाच रंगतदार सामना पूर्वी मित्र असलेल्या आणि आता प्रतिस्पर्धी बनलेल्या दोन रणनितीकारांमध्ये असल्याचंही चित्र दिसतंय.